शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातूनच मिळाले लेखनासाठी प्रोत्साहन

By admin | Updated: July 2, 2017 13:22 IST

लहानपणापासून छोटय़ा गोष्टी, बालकविता, गाणी हे सारे माङया घरातच ऐकायला मिळाले. पुढे ह्या गोष्टी, कविता वाचायचा मला छंद लागला.

 लहानपणापासून  छोटय़ा गोष्टी, बालकविता, गाणी हे सारे माङया घरातच ऐकायला मिळाले. पुढे ह्या गोष्टी, कविता वाचायचा मला छंद लागला. माङो आजोबा कै.ल.नि. छापेकर हे शिक्षणतज्ज्ञ होते. शालेय पाठय़पुस्तकात त्यांचे पाठ समाविष्ट असत. ‘मायबोलीचा अभ्यास’ ही त्यांची व्याकरणविषयक पुस्तकेही अभ्यासक्रमात होतीच. घरात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी चांदोबा, आनंद, कुमार, किशोर ही मासिके आवजरून वाचायला लावली. त्यातील शब्दकोडी सोडविण्याची सवय लावली.

मू.जे. महाविद्यालयात प्रा.राजा महाजन यांच्या अध्यापनामुळे काव्यलेखनाची आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संत साहित्य, आधुनिक कवी ह्यांचे साहित्य वाचनात आले. लेखनासाठी आई-वडील कै.विमल आणि कै.मु.द.छापेकर यांनी खूप प्रोत्साहन दिले. एखाद्या जीवलग मैत्रिणीला सांगावी, तशी माझी पहिली प्रेमकविता मी माङया आईला सांगितली. संस्कारक्षम घराण्यात असल्यामुळे ही कविता लिहावी की नाही, अशा मनस्थितीत मी होते. रात्री 11.30 वाजता माङया आईने ही अस्वस्थता अचूक हेरली आणि त्याचवेळी न कंटाळता मला कविता लिहावयास लावली.
मू.जे. महाविद्यालयात गेली 35 वर्षे मी अध्यापन करीत आहे. ह्या काळात संगीत सौभद्र : एक अभ्यास (संपादित), प्रा.सु.का. जोशी ह्यांच्या प्रेरणेने मराठी छंदविचार, सामाजिक भाषाविज्ञान (संपादित), मराठी नाटकातील स्थित्यंतर ही पुस्तके लिहिता आली. ही सारी पुस्तके विद्यापीठाचे संदर्भ-ग्रंथ म्हणून नेमली. याशिवाय अनेक छोटय़ा पुस्तिकांचे-ज्ञानेश्वरी अध्याय सातवा, मनाचे श्लोक अध्याय पहिला यांचे संपादन करता आले.  
महाविद्यालयात विविध प्रसंगांच्या निमित्ताने संगीतविषयक अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन करता आले. याचे सारे श्रेय माङो कुटुंबीय (माहेरचे व सासरचेही) माङो शिक्षक, प्राध्यापक ह्यांचे प्रामुख्याने आहे. त्याचप्रमाणे अभिजात साहित्य लेखन करणारे वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज इ. साहित्यिकांचे आहे. माङया कुटुंबीयांचे आशीर्वाद, मित्र-मैत्रिणींच्या सदिच्छा, सहका:यांचे प्रोत्साहन हे सारे यापुढेही सतत माङया पाठिशी राहतील आणि त्यामुळेच मला अधिक दज्रेदार लेखन करता येईल, अशी आशा आहे.
- प्रा.चारूता गोखले