शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या टँकरचे झाकण उडाले; चार जखमी

By admin | Updated: May 4, 2017 00:11 IST

सुदैवाने जीवितहानी टळली : वेल्डिंग सुरू असताना घडली दुर्घटना; मोठा आवाजामुळे फैजपुरात अफवांना ऊत

फैजपूर : शहरातील सावदा रोडवरील मुस्लीम स्मशानभूमीजवळील   बादशाह गॅरेजवर दुरुस्तीसाठी आलेल्या रिकाम्या टँकरला वेल्डिंग करीत असताना व टँकरमध्ये गॅस जमा  झाल्याने टँकरची दोन्ही झाकण उडून जोरदार आवाज झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र गॅरेजच्या टपावरील पत्रे जोरात उडाली व त्यात बुधवारचा बाजार असल्याने अफवांचासुद्धा बाजार गरम झाला. वेळीच पोलीस व संबंधितांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. बादशाह गॅरेजवर दोन दिवसापासून रिलायन्स लिहिलेले रिकामे टँकर (एमएच १९-झेड ७१९८) हे दुरुस्तीसाठी लावण्यात आलेले होते. बुधवारी या टँकरवरती वेल्डिंगची कामे दोन मजूर करीत होते तर अन्य दोन जण शेजारी बसले होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना  गॅस टँकरमध्ये जमा झाल्याने प्रथम शेवटच्या कप्प्याचे झाकण जोरात उडाले, त्यामुळे धावपळ करत टँकरवरील काम पाहणारे खाली उतरत असताना पुन्हा क्रमांक एकच्या कप्प्याचे झाकण उडाले झाकण उडाले असताना प्रचंड मोठा आवाज झाला. तर टँकर ज्या गॅरेजच्या पत्री शेडखाली लावले होते. त्यावरील पत्रे अक्षरश: हवेत उडाली. त्यातील काही झाडावर लटकली तर काही शेजारील स्मशानभूमीत जाऊन पडली. त्यात बुधवारचा बाजार असल्याने अफवांना ऊत आला व नागरिक घटनास्थळी धावले. या घटनेत शेजारील शे.इमाम, शाहीद खान (फैजपूर) व टँकरमालक सचिन चौधरी व जगदीश कोळी सांगवी हे चौघे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुठलीच प्राणहाणी झाली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गॅरेजचे मालक सलीम शेख, अख्तर शेख, माजी नगरसेवक  शे.जफर, फौजदार मनोहर मोरे, रामलाल साठे व सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फैजपूर पालिकेच्या अग्निशमन बंबानेसुद्धा तातडीने दाखल घेत टँकरवर पाण्याचा मारा केला या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.     (वार्ताहर)