शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तानंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

मूल्यशिक्षणा सोबत ई-लर्निगचा आदर्शपाठ

By admin | Updated: May 6, 2017 18:12 IST

सर्व शाळा डिजिटल करण्याच्या शासनाच्या या मोहिमेत सहभाग घेत

ऑनलाइन लोकमत / संजय हिरे

लोकसहभाग व श्रमदानातून डिजिटल शाळेकडे वाटचाल : शिक्षकांनी स्वत:च दिला  शाळेला रंगखेडगाव, जि. जळगाव, दि. 6 - प्रगत  शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ई-लर्निगचा शालेय वतरुळात गाजावाजा सुरू आहे. सर्व शाळा डिजिटल करण्याच्या शासनाच्या या मोहिमेत सहभाग घेत  खेडगाव येथील ब.शि.हिरे विद्यालयाच्या शिक्षकांनी गावातून 35 हजारावर लोकवर्गणी जमा करीत स्वत:च शाळा  इमारतीस रंग दिला. यातून बचत झालेल्या पैशांतून डिजिटल  साहित्य खरेदीचा शिक्षकांचा मानस आहे. यातून  या शिक्षकांनी  श्रमदानाचा  आदर्शपाठ घालून दिला आहे.  ई-लर्निग बरोबरच मूल्यशिक्षणाचे महत्त्व येथे अधोरेखित होते.शिक्षकांनी केली पैशांच्या अडचणीवर मातसवरेदय शिक्षण संस्था उंबरखेडे संचलित खेडगावच्या विद्यालयाची 12 खोल्यांची इमारत आहे. यातील तीन खोल्या संस्थेने नुकत्याच बांधून दिल्या. यामुळे  लगेचच पूर्ण इमारतीला  रंगकामासाठी पैसे उपलब्ध होण्यास अडचण होती.  मुख्याध्यापक सुभाष चौधरी, शिक्षकवर्ग व कर्मचा:यांनी  गावात फिरुन  ‘शाळा आपली..’ या भावनेतून ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले व तीन-चार  मदत फे:यातून  35 हजाराची लोकवर्गणी जमा झाली. त्यातून इमारतीला रंग घेतला.ई-लर्निगच्या रंगात रंगले शिक्षकखेडगाव येथील विद्यालय शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विद्याथ्र्याच्या विविधांगी विकासासाठी  नावारुपास आले आहे. यावर्षी डिजिटल शाळेचा उपक्रम येथे अग्रक्रमाने राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षणात नावीन्य आणणे व त्यासाठी तांत्रीक शिक्षण देणे, शाळेचे  स्वरुप (सजावट) बदलणे आवश्यक होते. लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातून शाळेला रंग देण्यासाठी पेंटरचा शोध घेतला. मात्र 35 हजाराची मागणी  झाली. हा पैसा  वाचविण्यासाठी शिक्षकांनीच  स्वत: शाळेला रंग देण्याचा निर्णय घेतला.  1 मे आधी शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी शिक्षकांनी शालेय कामकाज, परीक्षा, निकाल सांभाळून  इतर वेळेत 15 दिवस शाळेला रंग दिला  अन् शाळा उजळून निघाली. ई-लर्निगचा पाया रचला गेला. आता शिक्षकदेखील आर्थिक मदत देणार आहेत व रंगरंगोटीच्या कामातून कामासाठी वाचलेल्या पैशातून  डिजिटल साहित्य खरेदी करणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांच्या या उपक्रमाचे संस्था चेअरमन उदेसिंग पवार, सचिव  डी.डी.पाटील यांनी विशेष कौतुक केले. रंग देण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष चौधरी, शिक्षक रमेश अहिरे, नगराज मोरे, देवेंद्र अहिरे, अनिल चव्हाण, अमरसिंग पाटील, संजय पाटील, सचिनपगार, मनोज महाजन, सुनीता पाटील, रुपाली पाटील, शामकांत सूर्यवंशी, सचिन पाटील, हरपालसिंग पाटील, केवलसिंग कच्छवा, जगन्नाथ पाटील, युवराज हिरे यांनी परिश्रम घेतले.