शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसामुळे मराठवाडा, विदर्भात जाणारी डाळ निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठवाडा, विदर्भात झालेल्या दमदार पावसामुळे दळणवळणावर त्याचा मोठा परिणाम होऊन जळगावातून त्या ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मराठवाडा, विदर्भात झालेल्या दमदार पावसामुळे दळणवळणावर त्याचा मोठा परिणाम होऊन जळगावातून त्या भागात जाणारी डाळ निम्म्याने घटली आहे. त्यामुळे साठा मर्यादेपाठोपाठ आता डाळ उद्योगासमोर पुन्हा एकदा हे नवीन संकट उभे राहिले आहे.

जळगावातील डाळ उद्योग मोठा असून येथून देशाच्या विविध भागांसह विदेशातही मोठ्या प्रमाणात डाळ निर्यात होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून डाळ उद्योगासमोर एकामागून एक संकट येत आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला त्या वेळी भारतासह इतर देशात त्याचा शिरकाव होण्यापूर्वी अनेक देशांनी डाळींची अधिक मागणी केली व त्यामुळे डाळीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली होती. मात्र त्यानंतर संसर्ग भारतासह सर्वत्र पोहोचला व त्याचा डाळ निर्यातीवर परिणाम झाला. त्यानंतर यातून हा उद्योग सावरला. त्यानंतर यंदा २ जुलै रोजी केंद्र सरकारने कडधान्याच्या साठवणुकीवर मर्यादा आणल्याने डाळींचे भाव गडगडले व त्याचा फटका डा‌ळ उद्योगांना सहन करावा लागला.

एकाच महिन्यात दुसरे संकट

कडधान्य साठवणुकीवर मर्यादा व त्यानंतर जुलै महिन्यातच पुन्हा ठिकठिकाणी अतिवृष्टी होऊन त्याचा फटका डाळ उद्योगाला बसला. विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे रस्ते, पूल खचण्यासह अनेक व्यवसायांवरही त्याचा परिणाम झाला. या पावसामुळे नांदेड, जालना, बुलडाणा, खामगाव या भागात जाणारी डाळ निम्म्याने घटली आहे. रस्त्यांअभावी मोजकी वाहने कशीबशी जात असून त्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने त्यामुळे एरवी विदर्भात व मराठवाड्यात दररोज जाणारी २०० टन डाळ निम्म्यावर येऊन ती १०० टनांपर्यंतच जात आहे. जळगावात ७० ते ७५ दालमिल असून येथील उत्पादनावर त्याचा परिणाम होत असल्याचे दालमिल चालकांनी सांगितले.

विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन त्या भागात जाणारी डाळ निम्म्याने घटली आहे. साठा मर्यादेतून सावरत नाही तोच आता हे नवीन संकट आल्याने चिंता वाढली आहे.

- रमेश जाजू, सचिव, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन