शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

चार पलटी व शंभर फूट खोल ट्रक कोसळूनही चालक सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST

जळगाव : समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने ट्रकने तीन उलट्या घेत शंभर फूट खोल दरीत कोसळला. रविवारी ...

जळगाव : समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने ट्रकने तीन उलट्या घेत शंभर फूट खोल दरीत कोसळला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी जकातनाक्याजवळ हा अपघात घडला. दैव बलवत्तर म्हणून चालकाला जराही खरचटले नाही. राजू माळी (रा.पाळधी, ता.धरणगाव) असे या चालकाचे नाव आहे.

या घटनेबाबत घटनास्थळावरील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी येथील सोपान कोळी यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र.एमएच ०४ सीयू २२८८ ) राजू माळी हा तरुण चालक आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता ट्रक जळगावहून पाळधीकडे जात होता. यादरम्यान बांभोरी जकात नाक्यापासून काही अंतरावर समोरून येणार्‍या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात तसेच ब्रेक न लागल्याने चालक राजू माळी याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यात ट्रक थेट शंभर फूट खोल असलेल्या दरीत कोसळला. यावेळी पाच ते सहा झाडे तुटली. इतकी भयंकर घटना घडल्यानंतरही माळी यांना अगदी किरकोळ दुखापत झाली. ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

पाच तासांनंतर बाहेर काढला ट्रक

तीन ते चार वेळा पलटी घेतल्यानंतर ट्रक थेट दरीत कोसळला. तेथे एका ठिकाणी झाडाला अडकला. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह बांभोरी येथील तरुण तसेच नागरिकांनी धाव घेतली. वाहनधारक तसेच बांभोरी येथील तरुण यांच्या मदतीने अडकलेला ट्रक खाली नेण्यात आला. तत्पूर्वी चालक राजू माळी यास ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने तसेच बांभोरी तरुण, वाहनधारक यांच्या अथक परिश्रमाने तब्बल पाच तासांनंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ट्रक बाहेर काढण्यात यश आले.