शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

पातोंडा परिसरात दुबार व रखडलेल्या पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडासह परिसरात तब्बल एक महिन्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरिपाच्या रखडलेल्या व दुबार ...

पातोंडा, ता. अमळनेर :

पातोंडासह परिसरात तब्बल एक महिन्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरिपाच्या रखडलेल्या व दुबार पेरणीला पुन्हा सुरुवात झाली आहे.

पातोंडासह परिसरात मृग नक्षत्रात काय पण कोणत्याच नक्षत्रात पाऊस झाला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अल्पसा पाऊस झाला. बहुसंख्य शेतकऱ्यांनी पाऊस पडणारच या आशेवर कापसाची लागवड व मूग आदी पिकांची लागवड करून टाकली. तर काहींनी धूळ पेरणी केली. परंतु संपूर्ण जून महिना संपला. जुलैचा पहिला पंधरवडा संपत आला. पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या. पाऊसच नसल्याने लागवड झालेली कापसाचे कोंब जळाले. पहिली लागवड व पेरणी वाया गेली, मात्र १३ रोजी बऱ्यापैकी व १५ जुलै रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने पुन्हा मोडून आलेल्या पेरणीला व कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली. या वर्षीच्या खरीप हंगाम वाया जाणार अन‌् पाऊस आलाच तर पन्नास टक्के उत्पादन घटणार. अशा संकटात सापडलेल्या बळीराजाला काहीच सुचेनासे झाले. मात्र या पावसाने पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत.