शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

कमी व्याज दराचा मेसेज आला तर ॲप डाऊनलोड करु नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST

जळगाव : कमी टक्के व्याजदर तसेच कमी कागदपत्रे व नियमावली असल्याचे सांगून झटपट कर्ज मंजुरी करण्याचे आमिष सध्या सोशल ...

जळगाव : कमी टक्के व्याजदर तसेच कमी कागदपत्रे व नियमावली असल्याचे सांगून झटपट कर्ज मंजुरी करण्याचे आमिष सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखविले जात आहे. मोबाईलवर यासाठी आलेले मेसेज पाहून संबंधित ॲप डाऊनलोड केल्यानंतर संबंधितांच्या खात्यावरुन पैसे लुटले जात आहेत. त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

तत्काळ व ऑनलाईन कर्ज उपलब्ध करण्याचे आमिष दाखविणारे मेसेज अनेकांच्या मोबाईलवर सतत पडत असतात. ज्यांना अशा फेक ॲपची कल्पना आहे, ते त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मेसेज डिलीट करतात. मात्र, ज्यांना याची माहिती नाही किंवा कर्जाची नितांत गरज आहे, असे लोक याला बळी पडतात. मेसेजमधील लिंक ओपन करुन ॲप डाऊनलोड करतात आणि त्यांचा व्यक्तिगत सर्व डाटा अशा गुन्हेगारांच्या हाती लागतो. त्यानंतर ॲप डाऊनलोड केलेल्या व्यक्तीच्या खात्यावरुन पैसे गायब होतात. सायबर गुन्हेगारीचा हा परिणाम असून नागरिकांनी यासाठी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. कमी श्रमात अधिक पैसे कमविण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन फंडे शोधून काढत आहेत.

ॲप डाऊनलोड करताच बँक खात्यातून रक्कम गायब

पैसे कमविण्यासाठी सायबर गुन्हेगार मोबाईलवर मेसेज पाठवितो. त्यात तुम्हाला काही क्षणात कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवितो. मेसेजवरील लिंकच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप तुमच्याकडून काही परवानग्या मागते. तुम्ही एक्सेप्ट बटन दाबले म्हणजेच मान्य केले तर तुमची सर्व माहिती त्या सायबर चोराला मिळते. तुम्ही त्याला परवानग्या दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवरील ऑनलाईन पेमेंटचा डाटाही तो चोरुन घेतो. ॲपच्या आधारावर चोरलेल्या माहितीच्या आधारे सायबर चोर तुमचे खाते लागलीच साफ करतो.

सावधान..तुमचीही होऊ शकते फसवणूक

प्रकरण १

मुक्ताईनगर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला ऑनलाईन कर्ज देण्याच्या आमिषाने पावणे दोन कोटी रुपयात ऑनलाईन फसविले गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी दिल्लीतून या ठगाला अटक केली. यात विशेष म्हणजे पोलिसात तक्रार दिल्यानंतरही या व्यापाऱ्याने सायबर ठगाला पुन्हा ३० हजार रुपये ऑनलाईन पाठविले होते.

प्रकरण २

भडगाव येथील एका तरुणाला बजाज फायनान्सच्या नावाने सायबर गुन्हेगाराने संपर्क करुन कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने १ लाख ७५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी तीन जणांना नुकतीच दिल्लीतून अटक केली. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पॉलिसी लोनच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे तरुणाची फसवणूक झाली होती.

या गोष्टींपासून रहा सावध

प्रत्येक नागरिकाने फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलवर ऑनलाईन कर्जाबद्दल ऑफर देणारा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. नामांकित बँक अथवा वित्तीय संस्थेच्या नावाने मेसेज आला तर त्या बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून खातरजमा करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर, ॲपवर, क्यूआर कोडवर क्लिक करु नका.

कोट

आमिषाला बळी नका पडू

सध्या वेगवेगळी आमिषे व प्रलोभन दाखवून ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. कर्जाच्या आमिषाला अनेक जण बळी पडत असून त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. अशा आमिषाला बळी पडू नये. ॲप, लिंक, क्यू-आर कोड यापासूनही दूर राहावे. आपल्या खात्याची किंवा मोबाईलची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू नये, याबाबत प्रत्येकाने सतर्क राहावे.

- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम