जळगाव : वाढते औद्यौगिकीकरण, महागाई आणि शेतीचे काम न करण्याची मानसिकता यामुळे शेतीसाठी कुणी मजूर? देता का मजूर? अशी म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. मजुरांअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी आता यंत्राचा वापर केला आहे.
शेतीची मशागत म्हटली म्हणजे मजुरांची आवश्यकता असतेच. मात्र सध्या तालुक्यातील शिरसोली, म्हसावद, वावडदा, विटनेर, नशिराबाद, आसोदा, ममुराबाद, कानळदा, फुफनगरी, जळके, लमांजन, कुऱ्हाडदा, धानोरा, वीटनेर, पाथरी या गावांमध्ये मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे.
जळगाव शहराच्या जवळ असलेल्या या गावांमधील रहिवाशांना शहरात सहज रोजगार उपलब्ध होत आहे. जास्त श्रम नसलेले व कंपनी किंवा ऑफिसातील काम असल्याने अनेक मजूर हे शेतात काम करण्यासाठी नाखुश असतात. त्याचा परिणाम म्हणून या गावांमधील शेतकऱ्यांना जादा पैसे देऊन मशागतीसाठी मजुरांच्या विनवण्या कराव्या लागत आहे. त्यामुळे शेतीचे नियोजन कोलमडले आहे.
शेतीमध्ये काम न करण्याची मानसिकता
१)जळगाव शहरात रोजगाराची साधने उपलब्ध आहेत. किमान २०० ते ३०० रुपये रोज मिळत असतो. सावलीतील काम असल्यामुळे अनेकदा मजुरांची शेतात काम करण्याची मानसिकता नसते. त्यामुळे अनेकदा जास्तीचे पैसे देऊन काम करून घ्यावे लागत असल्याचे शिरसोली येथील शेतकरी नीलेश बुंदे यांनी सांगितले.
२) सध्या शासनाकडून अनेकांना महिन्याला १५ ते २० किलोच्या जवळपास मोफत धान्य मिळत असते. त्यामुळे काही मजुर फक्त आठवड्याचा बाजार व दैनंदिन किराणाचा विचार करतात. आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस मजुरी केली तरी गरजा भागत असल्याचे जळके येथील शेतकरी मुस्ताक पिंजारी यांनी सांगितले.
३) सर्वच क्षेत्रात भाववाढ होत आहे. त्या अनुषंगाने मजुरांकडून जास्त मजुरी मिळावी यासाठी आग्रह असतो. मजुराला अपेक्षित मजुरी न दिल्यास तो कामावर येत नाही. पूर्वी सालदार पद्धत होती त्यात मजूर एका वर्षासाठी त्या मालकाकडे करारानुसार काम करीत होता. मात्र तितकी रक्कम आता सहज कमविता येत असल्याचे शिरसोली प्र.बाे. मधील भागवत ताडे यांनी सांगितले.
ज्वारी व गव्हाची काढणी यंत्राद्वारे
पूर्वी ज्वारी, बाजरी, गहू तसेच मका यासारख्या पिकांची काढणी मजूर लावून करण्यात येत होती. मात्र आता मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांकडून यंत्राच्या साहाय्याने काढणी केली जात आहे. मात्र असे असले तरी ज्वारी, मका, तूर, उडीद, मूग याची कापणी मजुरांद्वारे केली जात आहे.
यंत्राची होतेय मदत
कल्टिव्हेटर, नागरंटी, पेरणी, सरी पाडणे ही कामे सध्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहे. बैलजोडीपेक्षा कमी दरात ही कामे होतात.
मजुरीचा दर
पाच वर्षांपूर्वीचा दर
पुरुष मजूर : १०० रुपये
महिला मजूर : ५० रुपये
आताचा मजुरी दर
पुरुष मजूर : ३५० रुपये
महिला मजूर : १७५ रुपये
-----------
लोकमत न्यूज नेटवर्क