शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

क्षणिक फायद्यासाठी स्वत: आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : रस्ता खराब आहे, म्हणून त्याचा जाब विचारत बसू नका, ते एका दिवसाचे काम नाही. आधी हेल्मेटचा वापर ...

जळगाव : रस्ता खराब आहे, म्हणून त्याचा जाब विचारत बसू नका, ते एका दिवसाचे काम नाही. आधी हेल्मेटचा वापर कराच. एखाद्या ठिकाणी लवकर पोहचायचे म्हणून नियमांचे उल्लंघन किंवा भरधाव वेगाने वाहने चालविणे, दुचाकीवर विना हेल्मेट व तीन सीट प्रवास करणे हे क्षणिक सुख असून त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन उद‌्घाटन झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक (नही) चंद्रकांत सिन्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही उपस्थित होते.

रस्ता खोदला तर गुन्हे दाखल करणार : डॉ.मुंढे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची स्थिती जिल्ह्यात चांगली असल्याने वाहने वेगाने चालतात व मध्येच शेतकरी रस्ता खोदून ठेवत असून त्यामुळे त्याच ठिकाणी अपघात होत असल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर असे प्रकार होत असतील तर संबंधित लोकांविरुध्द आम्ही गुन्हे दाखल करु, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले, त्याच बरोबर शहरात मनपा क्षेत्रात आयुक्तांनी दंडात्मक कारवाई करावी असेही त्यांनी सूचविले. कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी आभार मानले.

निरीक्षकांनी पथनाट्य सादर करुन वेधले लक्ष

परिविक्षाधीन मोटार वाहन निरीक्षकांनी आवारात विमा हेल्मेट व तीन सीट दुचाकी चालविण्याचे धोके यावर दोन पथनाट्य सादर केले. साक्षात यमराज कशी मृत्यूची वाट बघतो व मानवी चुका काय असतात, त्या सुधारण्याचे आपल्याच हातात असते असे यातून पटवून देण्यात आले. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांचे कौतूक केले.