शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची गैरसोय

By admin | Updated: January 4, 2017 00:22 IST

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्र : ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप; जि.प. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही जि.प. प्रशासनातर्फे कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ थांबत नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून नाइलाजाने उपचारार्थ रुग्णांना दुसºया दवाखान्यात न्यावे लागत आहे.  गेल्या आठवड्यात राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत बैठक झाली. त्या वेळी जि.प.चे  मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात बहुतेक वेळा अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड होत असते, असे कोणी आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, तरीही मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वैद्यकीय सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला  आहे. संबंधित कर्मचाºयांसह अधिकाºयांनी मुख्यालयीच थांबावे, याबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये तक्रार केली होती. तरीही ग्रामस्थांच्या या  मागणीला केराची टोपली जि.प. प्रशासनाने दाखविली. यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य अधिकाºयांना स्मरणपत्र दिले असतानाही अजून कार्यवाही झालेली नाही. दोन महिलांचा मृत्यू गंभीर अवस्थेतील दोन महिलांना वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या महिलांचा मृत्यू झाला होता. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोन उपकेंद्र असून एक देवी येथे, तर दुसरे मालपूर येथील मोहनशेठनगरजवळ आहे. परंतु, तेथेही आरोग्याचा पूर्णत: बोजवारा उडालेला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जि.प. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पावरा व डॉ. जयेश मोरे हे बºयाचदा नसतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. याकडे जि.प. प्रशासनाने लक्ष देऊन येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी थांबतील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कैलास पाटील, भरत मिस्तरी, प्रेमराज पाटील, मुकेश उपासनी, अशोक खलाणे, राकेश ठाकरे यांनी केली आहे. वैद्यकीय अधिकारी ‘आऊट आॅफ कव्हरेज’सद्य:स्थितीत मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संतोष पावरा व डॉ. जयेश मोरे हे कार्यरत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल क्रमांक ‘आऊट आॅफ कव्हरेज’ आला. तरीही ‘लोकमत’ प्रतिनिधीने दुपारी चार वाजता मालपूर केंद्रात भेट दिली असता, दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांपैकी एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.

११ गावातील ग्रामस्थांना अडचणी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ११ गावे जोडली आहेत. त्यात मालपूर,  चुडाणे, देवी, अक्कलकोस, सुराय, कलवाडे, कर्ले, परसोळे, वाडी, रुदाणे, आगरपाडा आदी गावातील गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने मालपूरच्या आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. मात्र, तेथे पुरेशा सेवा-सुविधांचा अभाव आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. रात्री-अपरात्री गंभीर रुग्ण किंवा गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दाखल करावयाचे झाल्यास डॉक्टर नसल्याने त्यांना योग्य ते उपचार मिळू शकत नाही. यामुळे इतरत्र अशा रुग्णांना दाखल करावे लागते.