शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Updated: March 2, 2017 20:49 IST

हिरापूर रोडवरील आदर्शनगरात २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान दगडू दौलत देवरे यांच्या घरात दोन अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करताना प्रतिकार करणाऱ्या

ऑनलाइन लोकमतचाळीसगाव, दि. 02 -  हिरापूर रोडवरील आदर्शनगरात २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान दगडू दौलत देवरे यांच्या घरात दोन अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करताना प्रतिकार करणाऱ्या वृध्द दाम्पत्यावर हल्ला केला. या घटनेत महिला जागीच ठार झाली असून तिचा पती गंभीर जखमी आहे. जखमीस धुळे सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. चोरटे ३५ हजारांचा ऐवज लंपास करून पसार झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.हिरापूर रोडवरील आदर्शनगर या गजबजलेल्या वस्तीत राहत असलेले सायकल दुरुस्ती करणारे दगडू दौलत देवरे यांचे राहते घर असून या घरात दोन अज्ञात चोरट्याने घरफोडी करण्याच्या उद्देशाने दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी दगडू देवरे यांची पत्नी जिजाबाई दगडू देवरे (वय ६०) या जागा झाल्या. हे लक्षात येताच चोरट्यांनी त्यांचे डोक्यात तसेच पलंगावर झोपलेले दगडू दौलत देवरे (वय ६५) यांचे डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात जिजाबाई देवरे या जागीच मृत्यूमुखी पडल्या मर दगडू देवरे हे गंभीर जखमी झाले. यावेळी चोरट्यांनी जिजाबाईचे अंगावरील मणी मंगळसूत्र व चांदीच्या वस्तू असा एकूण ३५ हजार रु.चा माल चोरुन नेला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक जालींदर सुपेकर यांच्यासह सर्व वरिष्टठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी श्वान पथकाने तितूर नदीपर्यंतचा माग दाखवला. तपासासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.घटना संशयास्पद...जखमी दगडू देवरे यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान असून त्यांना चार मुले व मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुले स्वतंत्र राहतात. देवरे यांची आर्थिक स्थिती सामान्य होती. या परिसरात अनेक आर्थिक संपन्न असलेल्या व्यक्तींची घरे असताना सामान्य देवरे कुटुंबाच्या घरावरच चोरटे का धडकले असा प्रश्न चर्चेत असून ज्या क्रूरतेने हल्ला झाला आहे, ते पाहता घटनेमागे काही वेगळे कारण तर नसावे ना? अशी शंकाही व्यक्त होत आहे.