शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ३५० हून अधिक हेक्टर क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

जळगाव : शनिवार, २९ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर, चोपडा, यावल, बोदवड, एरंडोल तालुक्यात शेतीपिकांचे ...

जळगाव : शनिवार, २९ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर, चोपडा, यावल, बोदवड, एरंडोल तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पाच तालुक्यांमध्ये ३५०.३३ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली असून सर्वाधिक फटका केळीला बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान रावेर तालुक्यात झाले असून त्याखालोखाल यावल तालुक्यात नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसत असून गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने पाच तालुक्यांत नुकसान झाले.

रावेर तालुक्यात सलग नुकसान

शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर तालुक्‍यात १८९ हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे पीक नष्ट झाले. यासोबतच यावल तालुक्यात १२१.०४ हेक्टर, एरंडोल तालुक्यात २७ हेक्टर चोपडा तालुक्यात १० हेक्‍टर व बोदवड तालुक्यात २.५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये रावेर तालुक्यात गुरुवारी ७५७.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाले होते. त्यानंतर पुन्हा शनिवारी रावेर तालुक्याला चक्रीवादळाने घेरले व त्यात पुन्हा केळीच्या पिकाला फटका बसला.

पाच तालुक्यांतील ४२ गावे बाधित

शनिवारच्या चक्रीवादळामध्ये रावेर तालुक्यातील १४, चोपडा तालुक्यातील चार यावल १५, बोदवड पाच, एरंडोल चार अशा एकूण ४२ गावांमधील ३५१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

सर्वाधिक केळीचे क्षेत्र

शनिवारी केळी, पपई, पेरू, लिंबू, डाळिंब, या पिकांचे नुकसान झाले. यात ३२१.५५ हेक्टर वरील केळी, सात हेक्‍टरवरील लिंबू, २.१८ हेक्‍टरवरील डाळिंब व पेरू तसेच पपई यांचे प्रत्येकी एकेक हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर आहे.

या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पहिला अहवाल शासनाला सादर होत नाही, तोच दुसरा फटका गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी शासनाकडे सादर केला. हा अहवाल सादर होत नाही, तोच पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात नुकसान झाले.