शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

देवकर यांचा खर्च २२ लाख, खडसे यांचा १ लाख ३४ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:03 IST

निरीक्षण नोंदवही : उन्मेष पाटील यांचा ८ लाख, डॉ. उल्हास पाटील यांचा दीड लाख रु. खर्च

विजयकुमार सैतवाल ।जळगाव : १७ व्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून उमेदवारांच्या खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाने तयार केला आहे. निरीक्षण नोंदवहीनुसार जळगाव लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा खर्च सर्वाधिक २२ लाख ५४ हजार ९३० रुपये झाला आहे तर युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा खर्च ८ लाख ७५ हजार ७५६ रुपये झाला आहे.रावेर मतदार संघातही आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा खर्च एक लाख ४३ हजार ८३५ रुपये तर युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा खर्च एक लाख ३४ हजार ९९५ रुपये झाला आहे. दरम्यान, खर्चाच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीही मागे नसून जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार अंजली बाविस्कर यांचा खर्च हा २६ हजार ४८९ झाला आहे.दुसरीकडे ज्या उमेदवारांनी खर्च सादर केला आहे तो खर्च व निरीक्षण नोंदवहीतील नोंदीतील खर्चात मोठी तफावत आहे. मात्र उमेदवारांचा वाहनावरील खर्च तथा अन्य तत्सम खर्च निवडणूक विभागाने नोंदवल्यामुळे निरीक्षण नोंदवही आणि प्रत्यक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदीत तफावत आहे.मात्र अंतिम खर्च सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबतच सूक्ष्म खर्चाचा विचार करून त्यांचा मेळ घालण्यात येईल, असे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ प्रमाणेच यंदाही ७० लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना १० हजार रुपयापर्यंतचा खर्च रोखीने करण्यास संमती देण्यात आली आहे.यापेक्षा होणारा अधिकचा आर्थिक व्यवहार हा उमेदवारांना रोखीने करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघातील आघाडी व युतीच्या उमेदवारांसह माघार घेतलेले व इतर उमेदवार असे ११ जणांनी आपला खर्च सादर केलेला नाही.उमेदवारांना नोटीसनिवडणुकीसंदर्भात खर्च सादर करण्यासंदर्भातील बैठकीस उपस्थित नसलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघातील दोन तर रावेर मतदार संघातील ११ उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागाने नोटीस बजावली असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.वाहनांवरील खर्च जादाउमेदवारांचा प्रामुख्याने वाहनावरील खर्च तूर्तास जादा असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. निरीक्षण नोंदवहीनुसार जळगाव लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा खर्च २२ लाख ५४ हजार ९३० असला तरी प्रत्यक्षात त्यांनी ८ लाख ७९ हजार ४४४ रुपये खर्च झाला असल्याचे म्हटले आहे. युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनाही निरीक्षण नोंद वहीतील खर्च अमान्य असल्याचे सांगण्यात आले.रावेरमध्ये खर्च सादर नाहीरावेर लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा निरीक्षण नोंद वहीनुसार १ लाख ४३ हजार ८३५ रुपये खर्च झाला आहे तर युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचाही निरीक्षण नोंद वहीनुसार खर्च एक लाख ३४ हजार ९९५ रुपये खर्च झाला आहे. मात्र या दोन्हीही उमेदवारांच्या प्रत्यक्ष नोंदवहीत हा खर्च नमूद नसल्याचे सांगण्यात आले.