शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात दोघा बहिणींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

(‘सीडी’साठी) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

(‘सीडी’साठी)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यातील मौजे अंचलवाडी येथे चिंचेचे झाड अंगावर कोसळून दोघा बहिणींचा तर पळास खेडे येथील एका शेतकऱ्याचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे. यासह जिल्ह्यातील ५०० हेक्‍टरवरील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात आता निसर्गानेदेखील कोणतीही कसर सोडली नसून, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व कोकण किनारपट्टीसह जळगाव जिल्ह्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून ज्योती बल्लू बारेला व रोशनी बल्लू बारेला या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर पळासदे येथे बांधकामातील पत्रे व विटा अंगावर कोसळून दिलीप भादूगीर गोसावी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत केळीव्यतिरिक्त शेतांमध्ये कोणतेही पीक नसल्याने शेतीचे फार नुकसान झाले नसले तरी जळगाव, चोपडा तालुक्यातील काही गावांमधील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या कांदे बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे शेतात ठेवलेला चारादेखील ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील विद्युत खांब व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच फिडरवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव, अमळनेर, चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये २४ ते ३२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.