शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी पिकांना फटका

By admin | Updated: May 4, 2017 00:15 IST

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : मका-बाजरी धोक्यात, गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी

आडगाव, ता. चाळीसगाव : मन्याड धरणातून नुकतेच पाण्याचे तिसरे आवर्तन सोडले गेले. त्याचा लाभ मोजक्याच शेतकºयांना झाला असून उर्वरित शेतकºयांचे मका-बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाटचारी क्रमांक ११ व देवळी मायनरवरील शेतकºयांना  मोठा फटका बसला आहे.  याला पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप रावसाहेब गोविंदा पाटील, किरण शिवाजी पाटील, अविनाश सदाशिव पाटील, जालिंदर जगन्नाथ पाटील, विनोद तुकाराम पाटील आदींनी केला आहे.पाणी नियोजन हुकलेधरण यंदा १०० टक्के भरल्याने तीन-चार आवर्तने अपेक्षित होती, परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे केवळ दोन आवर्तने व्यवस्थित मिळाली. तिसरे आवर्तन लवकर देऊन एक नंबर सेक्शनला पाणी टाकण्याची घाई केली व इकडचे शेतकरी काही जेवले तर काही उपाशी राहिले. एक नंबर सेक्शनला पाणी विकल्याचा आरोपदेखील वरील शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे                आहे.गिरणेला आवर्तन मग मन्याड नदीत पाणी कसे?मन्याड धरणातून ५० ते ६० क्युसेसचा प्रवाह सुरू आहे. यातील ४० क्युसेस पाणी चारी क्रमांक  ६ ला सुरू आहे तर उर्वरित २० क्युसेस पाणी सायगावच्या मन्याड नदीत सोडले आहे. इकडे शेतकरी पिकांना पाणी भरण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे पाणी या चारीला व नदीला सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता धरणात पाणीच शिल्लक  नाही. तुमच्यापर्यंत पाणी येणे शक्य नाही असे बोलले जात आहे.                                    पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले असते तर चारी क्रमांक  ६ पासून तर १२ पर्यंत  सर्व चारींना किमान चार-पाच दिवस पाणी चालले असते. शिवाय भरणा क्षेत्रदेखील कमी झाले होते.  परंतु मेन कॅनॉलवर कुणाचाही अंकुश नसल्याने वाटेल तेव्हा मनाला पटेल त्याप्रमाणे पाणी लावताना प्रत्यक्ष पाहणीवरून दिसले. याशिवाय मेन कॅनालला अर्धवट कोरुन बºयाच शेतकºयांनी पाईप टाकून पाणी चोरी केल्याचे दिसून आले. काही शेतकºयांनी विहिरींना पाणी उतरावे म्हणून नाले, डबके, केटीवेअर भरून घेतले. अशा पाणी चोरांवर पाटबंधारे विभागाने काय कारवाई केली, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.