शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कृउबा सचिवाविरुद्ध खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 01:26 IST

अमळनेर : संचालकाकडून खंडणी मागितल्याची तक्रार

अमळनेर  : धरणगाव  तालुक्यातील नांदेड येथील मिळकत विक्रीबाबतचा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तसेच संचालकपद अपात्र न करण्याच्या मोबदल्यात दोन लाखाची खंडणी मागून, त्यापैकी 50 हजार रुपये घेतल्याप्रकरणी कृउबा सचिवाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सचिवाने दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत कृउबा संचालकाने कानशिलात लगावून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.कृउबा संचालक विजय प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अमळनेर बाजार समितीच्या मालकीची नांदेड उपबाजार जागा लिलावाने बेकायदेशीररित्या विक्रीचे ठरविले होते. या जागेची किंमत 5 ते 6 कोटी असतांना, आरोपी सचिवाने सदरची मिळकत 60 ते 80 लाखार्पयत विक्री  करण्याचे कारस्थान केले. याबाबत मी जिल्हा उपनिबंधकांकडे या बेकायदेशीर विक्रीला विरोध केला. तसेच आरोपीने माङयाविरुद्ध कृउबा समिती संचालक पद रद्द होण्याबाबतचा खोटा ठराव मंजूर केला. आरोपीने तुमचे संचालकपद पुन्हा प्रस्थापित करून देतो, त्यासाठी दोन लाख रूपये द्या अन्यथा तुमचे संचालकपद कुठल्याही परिस्थितीत रद्द करून आणू  असे सांगत खंडणीची मागणी केली. दि.2 जानेवारी 17 रोजी सायंकाळी कृउबा समितीच्या गेटजवळील हॉटेलमध्ये सुभाष देसले, दीपक पाटील यांच्या समक्ष आरोपीला 50 हजार रुपये दिले. याप्रकरणी सचिव डॉ. उन्मेषकुमार राठोड यांच्याविरुद्ध भादंवि 384, 506 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.(वार्ताहर)  संचालकपद  रद्द करण्याच्या सुनावणीस हजर राहत असल्याचा राग येऊन कृउबा संचालकाने सचिवाच्या कानशिलात लगावल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात कृउबा संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4कृउबा संचालक विजय प्रभाकर पाटील यांना अपात्र ठरविण्याबाबत सभापती व संचालक मंडळाने ठराव केला होता. त्याची सुनावणी अमळनेर येथील सहायक निबंधक कार्यालयात सुरू आहे. त्या सुनावणीस कृउबा सचिव डॉ. उन्मेष राठोड हे हजर राहत असतात. तुम्ही सुनावणीला हजर का राहतात असा जाब विचारत विजय पाटील हे दुपारी कृउबा कार्यालयात गेले. त्यांनी सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्या कानशिलात लगावून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. डॉ. राठोड यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विजय पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.