शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्तीसाठी नगरसेवकांची एकजूट

By admin | Updated: May 13, 2017 00:51 IST

जामनेर : पालिकेच्या सभेत दारू दुकान स्थलांतराच्या विषयावर चर्चा, नगराध्यक्षांचीही अनुकूलता

जामनेर : येथील पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी दारू दुकानांना शहरात स्थलांतर  करण्यासाठी दिल्या जाणा:या कथित परवानगीस विरोध केला. यावर नगराध्यक्षांसह सत्ताधारी सदस्यांनीदेखील  पाठिंबा देऊन दारूमुक्तीसाठी  सर्वजण एकत्र असल्याचे सांगितले, तसे चित्र दिसूनही आले.पालिकेच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी  काँग्रेस आघाडीचे नगरसेवक पारस ललवाणी, रुपेश चिप्पड, सविता पाटील, नंदा चव्हाण, प्रा.उत्तम पवार, शोभा धुमाळ, अनिल बोहरा, सुनील नेरकर, जावेद इकबाल, रशीद, हसीनाबी मन्यार, सुनीता भोईटे आदींनी नगराध्यक्षांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शहरातील दोन देशी दारू दुकानदारांनी त्यांचे दुकान बशीरनगर व गणेशवाडी भागात स्थलांतरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या भागात प्रार्थना स्थळे, शाळा असून संमिश्र वस्ती आहे. परिसर संवेदनशील असून दारू दुकानांना परवानगी दिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नागरिकांची भावना लक्षात घेऊन स्थलांतरास परवानगी नाकारावी व भविष्यातदेखील बिअरबार, वॉईनशॉप व देशी दारू दुकानांना नाहरकत देऊ नये. नगराध्यक्षा साधना महाजन यांनी या विषयी अनुकूलता दर्शविली. सभेत शहरात सुरू असलेल्या कोटय़वधीच्या विकास कामांबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपचे गटनेते महेंद्र बाविस्कर यांनी थेट नगराध्यक्षा साधना महाजन यांना सांगितले की, कोटय़वधीची विकास कामे मंजूर झालेली असली तरी संबंधित ठेकेदार काम करीत असल्याचे कुठेच दिसत नाही.बाविस्कर यांच्या या भूमिकेवरून  सदस्यांमध्ये चर्चा होत होती.पालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामांपैकी नुकताच आठवडे बाजारात बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या भूमिपूजन सोहळा झाला. या कार्यक्रमास आघाडीच्या नगरसेवकांना बोलाविण्यात आले नाही, हा मुद्दा धरून पिंटू चिप्पड व जावेद रशीद यांनी नगराध्यक्षांना सांगितले की, विकास कामात आमचाही सहभाग असल्याने भूमिपूजनास आम्हालाही बोलाविले जावे.  पालिका ही काही कुणा एकाची प्रायव्हेट कंपनी नव्हे, असेही जावेद यांनी सांगितले. या बैठकीस नगरसेवक छगन झाल्टे, श्रीराम महाजन, इस्माईल खान, कल्पना पाटील, शहनाजबी न्याजमहम्मद, सुनीता बेनाडे, महेंद्र बाविस्कर व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर उपस्थित होते.