शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सा.बां.विभागाकडून रस्ते ताब्यात घेण्यास यावल पालिकेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 16:36 IST

यावल नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते पालिकेने ताब्यात घेण्यास नगरसेवकांनी विरोध केला.

 यावल, दि.18- : यावल  नगरपालिकेच्या मंगळवारी 18 रोजी झालेल्या मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते पालिकेने ताब्यात घेण्यास नगरसेवकांनी विरोध दर्शवित असे झाल्यास शहरात पुन्हा देशी-विदेशी दारुची दुकने सुरू होतील, अशी भूमिका बजावत रस्ते ताब्यात घेण्याच्या विषयाला विरोध केला. या  निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.

पालिकेची मासीक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली मंगळवारी पार पडली. सभा पटलावर 39 विषय ठेवण्यात आले होते. विषय क्रमांक 28 वगळता सर्व विषय एकमताने मंजूर  झाले. सभा अजेंडय़ावर 39 विषय होते. विषय क्रमांक 28 हा शहर हद्दीतील अंकलेश्वर-ब:हाणपूर  या महामार्गासह यावल-भुसावळ हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  पालिकेने ताब्यात घेण्याविषयीचा होता. सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गापासून 500 मीटरच्या आतील सर्व परमीटबार, बिअरबार सह देशी विदेशी दारुच्या दुकांनाना परवाने न देण्याविषयी आदेश दिल्याने शहर व परीसरातील 13 दुकाने (बार) बंद झाले आहेत. शहरातील महामार्ग व राज्यमार्ग पालिकेने ताब्यात घेतल्यास ते पुर्ववत सुरू होवू शकतील    व व्यावसायिकांचा व्यवसाय पुन्हा उभा राहील या आशेने व्यावसायिकांनी पालिकेकडे रस्ते ताब्यात घेण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार  हा विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला होता. त्यावर नगरसवेक अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे व महिला नगरसेवक नौशाद तडवी यांनी रस्ते ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला. रस्त्याने अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्ता वारंवार खराब होणार असल्याने   पालीका त्याची निगा राखू शकणार नसल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले असता  सर्व नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवत  एकमताने ठराव नामंजूर केला.