शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पार्किंग करणा-यांना मनपाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महानगर पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी शहरातील विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगर पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी शहरातील विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. २२ ते २४ हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच फुले मार्केट परिसरात रस्त्यावर वाहन पार्किंग करणा-या वाहनधारकांना मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चांगलाच दणका दिला आहे. यावेळी ४६ वाहने जप्त करुन वाहतूक पोलीस विभागाच्या स्वाधीन करण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

फुले मार्केटसह, बळीरामपेठ, सुभाष चौक यासह का.ऊ. कोल्हे विद्यालयाच्या समोर हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. फुले मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने तसेच, का.ऊ.कोल्हे विद्यालयाच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने मनपा प्रशासनातर्फे कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यावेळी २२ ते २४ हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलीस व मनपाचे पथक फुले मार्केटमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे फुले मार्केटने मोकळा श्‍वास घेतला होता. तसेच फुले मार्केट परिसरात नो पार्किंग झोन केला असताना देखील त्या ठिकाणी वाहने लावणा-या वाहनधारकांवर देखील मनपाकडून दंड करण्यात आला. दरम्यान, मनपाने बुधवारी केलेल्या कारवाईमुळे फुले मार्केट परिसरात गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला.