शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानेे मयत झालेल्या पोलीसपाटलाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथील पोलीसपाटील उल्हास लांडगे यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाल्याने शासनातर्फे ५० लाखांचा धनादेश आमदार ...

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथील पोलीसपाटील उल्हास लांडगे यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाल्याने शासनातर्फे ५० लाखांचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. दरम्यान, कुटुंबाची परिभाषा न कळल्यामुळे रकमेवरून सासू-सुनेत झालेले गैरसमज पोलीस व प्रशासनच्या मध्यस्थीने मिटवण्यात येऊन दोघांत समझौत्याने रक्कम वितरित करण्यात आली.

जवखेड्याचे पोलीसपाटील उल्हास लांडगे यांना गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाने कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान जाहीर केले होते.

प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीसपाटील संघटना यांनी कागदोपत्री पाठपुरावा करून शासनदरबारी आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न केल्याने लांडगे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान मंजूर झाले. मात्र कुटुंबाच्या व्याख्येत पत्नी आणि मुले असा गैरसमज होऊन संपूर्ण रक्कम आपलीच आहे, असा ग्रह झाला होता. मात्र लांडगे यांची वृद्ध माता हीदेखील कुटुंबाची सदस्य आहे आणि मुलाच्या अनुदानात कुटुंब सदस्य म्हणून तिचाही अधिकार असल्याने तिलादेखील उदरनिर्वाहासाठी पैशाची अपेक्षा होती. सासू-सुनेतील मतभेद दूर करण्यासाठी समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीसपाटील संघटना एकत्र येऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या समक्ष हा वाद मिटवण्यात आला आणि पोलीसपाटील यांच्या वृद्ध मातेला आठ लाख ११ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला.

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंबाला धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीसपाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष भानुदास पाटील, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, डी.ए. धनगर, अशोक पवार, मनोज रत्नपारखी, ए.सी. तेले, आनंदा बच्छाव, दिनेश भलकार, जगदीश भागवत, आर.पी. धनगर, पोलीस नाईक शरद पाटील हजर होते.

===Photopath===

260621\26jal_3_26062021_12.jpg

===Caption===

मयत पोलीस पाटील उल्हास लांडगे यांच्या कुटुंबाला ५० लाखाचा धनादेश देताना आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व इतर. (छाया : अंबिका फोटो, अमळनेर)