शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कप्रमुखांनी उमेदवारांची घोषणा थांबविली

By admin | Updated: January 10, 2017 00:15 IST

कार्यकत्र्याची गर्दी : जि.प.व पं.स.निवडणुकीसाठी 577 उमेदवारांच्या मुलाखती

जळगाव : शिवसेनेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांसाठी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी इच्छुकांच्या सोमवारी शहरातील सागर पार्क मैदान परिसरातील एका हॉटेलात मुलाखती घेण्यात आल्या. त्यात 34 जि.प. गटांसाठी 153 उमेदवार इच्छुक असल्याचे मुलाखतीदरम्यान समोर आले. नेत्यांनी काही जि.प.गटांसाठी उमेदवार निश्चित केले व सायंकाळी यादी जाहीर करण्याची तयारी केली.. पण निश्चित उमेदवारांची यादी जाहीर करू नका.. त्यामुळे काही चुकीचे संदेश जायला नको, इतर वाद व्हायला नको.., अशी सूचना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकरांनी केली. यामुळे  निश्चित उमेदवारांची यादी सेना नेत्यांना जाहीर करता आली नाही. जिल्ह्यात विविध गटांमध्ये तीन उमेदवारांची नावे निश्चित केली, पण ही नावे जाहीर करणे टाळले. राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी मुलाखती  घेतल्या. तीन उमेदवारांची नावे मिर्लेकरांनी थांबविलेजळगाव तालुक्यातील एक व इतर ठिकाणच्या दोन उमेदवारांची नावे सोमवारी सायंकाळी जाहीर करण्याचा निर्णय सेनेचे नेते व पदाधिका:यांनी घेतला होता. त्याबाबत संपर्कप्रमुख मिर्लेकर यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. त्यास मिर्लेकर यांनी नकार दिला. यामुळे तीन निश्चित नावे सोमवारी जाहीर होऊ शकली नाहीत. मिर्लेकर यांचा सोमवारी वाढदिवस होता, त्यामुळे ते मुलाखतीसाठी येऊ शकले नसल्याची माहिती मिळाली. काही उमेदवारांनी सोबत समर्थकही आणले होते. त्यामुळे संबंधित                               हॉटेल व परिसराला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले. एकाच वेळी सर्वाना पाचारणमुलाखतीसाठी संबंधित गट व गणाचे    नाव उच्चारून इच्छुकांना बोलावले जात               होते. पण मुलाखतीसाठी एका इच्छुकाला स्वतंत्र वेळ न देता एकाच वेळी बोलावून  त्यांची नावे व इतर माहिती घेऊन त्याची नोंद केली जात होती. चार ते पाच मिनिटात इच्छुकांशी एकाच वेळी चर्चा करून नंतर कळवू, असा संदेश देऊन परत पाठविले जात होते. इच्छुकांसोबत त्यांचे समर्थक चारचाकी, दुचाकी वाहनांवर आले होते. यामुळे संबंधित हॉटेल व परिसरात वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या. हॉटेलला दुचाकींचा गराडा असल्याचे दिसून आले. सात तालुक्यांसाठी मुलाखतीशिवसेनेकडून जि.प.साठी उमेदवारी मिळावी यासाठी जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, भडगाव व चाळीसगाव या तालुक्यांमधील 153 जणांनी मुलाखती दिल्या. तर पं.स.साठी आठ तालुक्यांसाठी 324 जणांनी मुलाखती दिल्या. एकूण 577 जणांच्या मुलाखती पदाधिकारी व नेत्यांनी घेतल्या.  शिवसेनेची जि.प. गटासाठी मुलाखती दिलेल्या इच्छुकांची तालुकानिहाय संख्या (कंसात संबंधित तालुक्यातील एकूण गट) : जळगाव 42 (5), धरणगाव 27 (3), अमळनेर 11 (11), पारोळा 23 (4), एरंडोल 23 (3), भडगाव 21 (3),               चाळीसगाव 16 (3).  पं.स.साठी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिलेल्यांची तालुकानिहाय संख्या - जळगाव 72 (10), 48 (6), अमळनेर 22 (8), पारोळा 26 (8), एरंडोल 31 (06), पाचोरा 71 (10), भडगाव 15 (6), चाळीसगाव 39 (14).