शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ऑलिम्पिक खेळाडूना सेल्फी पॉईंटवरून शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

अमळनेर : जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून शासनाच्या क्रीडा व ...

अमळनेर : जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सूचनेनुसार तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे सेल्फी पॉईंटचे उदघाटन माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराणा प्रताप चौकातील जि.प. विश्रामगृहाजवळ मिशन ऑलिम्पिक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, माजी चेअरमन नीरज अग्रवाल, प्रवीण जैन, अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील, माजी उपनगराध्यक्ष चांदूसिंग परदेशी, आरोग्य सभापती श्याम पाटील, नगरसेवक मनोज पाटील, हेमंत पवार हजर होते.

आयोजन तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी केले.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख शरद सोनवणे, महेश माळी, क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय पाटील, किशोर मोरे, जितेंद्र ठाकूर, स्वप्नील पाटील, रेहान शेख, हर्षद शेख, विशाल काळे व खेळाडू यावेळी अनेकांनी सेल्फी काढून ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. महाराणा प्रताप चौकातील सेल्फी पॉईंट तरुण व खेळाडूंचे आकर्षण ठरला. तरुण सेल्फी काढून सोशल मीडियावर शुभेच्छा देत होते.