लोकमत न्यूज नेटवर्क
दापोरा, ता. जळगाव : जिल्हा परिषद शाळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केवळ ३०० लसींचा पुरवठा झाला व लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने लसीकरणावेळी गोंधळ निर्माण झाला होता.
गावाची लोकसंख्या जवळपास चार हजारापर्यंत असताना आरोग्य विभागाकडून लसीचा मात्र कमी होत असल्याने बरेच ग्रामस्थ अजूनही लस घेण्यापासून वंचित आहेत. लस नसल्याने रांगेत ग्रामस्थांना ताटकळत उभे राहावे लागते. मात्र काहींना कोणताही नंबर न लावता लस घेण्यासाठी प्रवेश दिला जात असल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. लसीकरण केंद्र आरोग्य कर्मचारीव्यतिरिक्त इतरांना प्रवेश दिला जात असल्यामुळे वशिलेबाजी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
फोटो कॅप्शन - दापोरा येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड लसीकरणावेळी झालेली गर्दी. फोटो क्रमांक ०९ सीटीआर ४३