भुसावळ : जिल्हाभरात धूम स्टाईल मंगळसूत्र व चेन लांबवण्याचे प्रकार सुरू झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये गुरुवारी पहाटे खडका रोडवरील इराणी वस्तीत बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग राबवल़े अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह एक दुचाकी जप्त करण्यात आली असून अन्य सहा इराणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आह़ेदरम्यान, गेल्या अनेक महिन्यांनंतर शहरातील इराणी वस्तीत झालेल्या कोम्बिंगनंतर गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आह़े पहाटे दीड तास कोम्बिंगगुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास खडका रोडवरील इराणी वस्तीत पोलिसांनी कोम्बिंग राबवल़े वस्तीतील अनेक घरांची झडती घेण्यात आली. शिवाय रेकॉर्डवरील पसार गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला़अत्याचारातील संशयित ताब्यातपोलिसांच्या कोम्बिंगमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यातील 17 वर्षीय अल्पवयीन संशयितास ताब्यात घेण्यात आल़े आरोपीविरुद्ध गुरनं़ 231/16, भादंवि 376 दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली़ ही दुचाकी चोरीची असल्याचा पोलिसांना संशय आह़े सायंकाळर्पयत गाडीच्या मालकीबाबत कुणीही पुरावे दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितल़ेसहा इराणींवर प्रतिबंधात्मक कारवाईकोम्बिंग दरम्यान इराणी वस्तीतील सहा जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल़े संबंधितांची सखोल चौकशी करण्यात आली तर सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई करण्यात आली़एरवी इराणी वस्तीत कोम्बिंग होणार असल्याची माहिती गुन्हेगारांना मिळाल्यानंतर ते पसार होत असल्याच्या घटना पाहता सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईबाबत अत्यंत गुप्तता बाळगली़ पहाटे नीलोत्पल यांच्यासह पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, उपनिरीक्षक क़ेटी़ सुरळकर, विजय नरवाडे यांच्यासह बाजारपेठ डीबी स्टाफ तसेच आरसीपी प्लाटूनची कोम्बिंगसाठी मदत घेण्यात आली़1 समीरअली अफसरअली इराणी (26), गुलाम हुसेन हैदर जाफरी इराणी (30), अकबरअली आझादअली इराणी (32), अली शौकतअली इराणी (32), कंबरअली शौकतअली इराणी (23), आया नियान अली इराणी (22) या सहा इराणींना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई केली़2 इराणी वस्तीतील कोम्बिंगमध्ये नाशिक पासिंगची एक दुचाकी जप्त करण्यात आली़ ही दुचाकी चोरीची असल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आह़े या दुचाकीच्या मालकीसंदर्भात गुरुवारी सायंकाळर्पयत कुणीही कागदपत्रे सादर केले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़ धडक कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली़ 3 बोदवड येथे चेन स्नॅचिंगच्या प्रयत्नात रंगेहाथ पकडण्यात आलेल्या व शिक्षा भोगून आलेल्या शेरू अली इराणीविरुद्ध जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली़
इराणी वस्तीत पोलिसांचे दीड तास कोम्बिंग
By admin | Updated: April 14, 2017 00:28 IST