शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून शहराला लसच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक लागला असून, गेले दोन दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्र बंद होती ती पुन्हा लस नसल्याने शुक्रवारी बंद राहणार आहे. यात रोटरी भवनाच्या केंद्रावर कोव्हॅक्सिन हे दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहे.

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के लोकसंख्या ही १८ ते ४४ वयोगटांची असून, याच वर्गाला गर्दीचा अधिक सामना करावा लागत असल्याने त्यांचे लसीकरण पूर्ण व्हावे, अशी मागणी सुरुवातीपासून असताना याच वयोगटाला नेमकी सर्वांत शेवटी लस मिळत आहे. मात्र, त्यातही या वयोगटाचे लसीकरण सुरू होताच, लसींचा तुटवडा समोर येत आहे. मंगळवारी या वयोगटाचे लसीकरण सुरू होताच शहरातील महापालिकेच्या केद्रांवर लस संपली. बुधवार व गुरुवारी दोन दिवस केंद्र बंद होते. यातील काही केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लस सुरू होती.

डाटा एंट्री ऑपरेटर बदलविले

रेडक्रॉस रक्तपेढीच्या ठिकाणी नियुक्त जिल्हा रुग्णालयाच्या दहा डाटा एंट्री ऑपरेटर यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. या ठिकाणी अन्य डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात आले आहे. दरम्यान, रेडक्रॉस रक्तपेढीचे केंद्रही लस नसल्याने शुक्रवारी बंद राहणार आहे.

आदिवासी भागातील गावांमध्ये मोहीम

शुक्रवारी दुपारपर्यंत ३१ हजार ५०० कोविशिल्ड लसीचे डोस येणार आहे. ते शनिवारी केंद्रावरही लस उपलब्ध होणार आहे. दरम्यान, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांतील आदिवासी भागांमध्ये जास्ती जास्त लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना प्रशासनाकडून आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. त्यानुसार त्या भागातील उपकेंद्रांना अधिक लसीचा पुरवठा केला जाणार आहे. तीस गावांमध्ये ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे.