लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने हे आंदोलन आता तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी अधिवेशनात विधिमंडळाला घेराव घालून एकाही आमदाराला प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी जळगावात दिला. धनगर समाज महासंघ, मल्हार सेना कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघ यांच्यावतीने रविवारी जळगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमित्त सामाज मेळावा झाला. आरक्षण मिळाले नाही तर दिल्लीत आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी दिला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}