शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 22:43 IST

दोन दशकांपासून मंजुरी मिळून रखडलाय प्रकल्प

ठळक मुद्दे जळगाव, जामनेर तालुक्याला लाभनिधीअभावी कामाला सुरूवातच नाही१८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२७- भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळून आता सुमारे दोन दशकांचा कालावधी उलटला, मात्र निधीअभावी हे काम अद्यापही सुरूच झालेले नाही. या योजनेत नंतर समाविष्ट केलेले बंधाºयाच्या उंचीवाढीचे काम तेवढे पूर्ण झाले आहे. आता या योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या पुढील आठवड्यातील दौºयात उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रशासकीय मान्यतेचा घोळया योजनेस तापी पाटबंधारे महामंडळाने १ मार्च १९९९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यावेळी या योजनेचा खर्च ४३८ कोटी १४ लाख ५४ हजार रुपये होता. मात्र हा प्रकल्प सुरू न झाल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली. १ सप्टेंबर १९९९ रोजी या प्रकल्पाच्या ५५७ कोटी २ लाख १४ हजार रुपये किंमतीस तापी महामंडळाने नव्याने प्रशासकीय मान्यता दिली. आता या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.अशी आहे योजना...या योजनेंतर्गत भागपूर उपसा सिंचन योजना व शिरसोली-२ लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेंतर्गत तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या जलाशयातून वाघूरमध्ये येणारे पुराचे पाणी वाघूर नदीच्या काठावर कडगाव गावाजवळ जॅकवेल बांधून उचलण्यात येणार आहे. जॅकवेलपासून रायझिंग मेन द्वारे दोन टप्प्यात पाईपलाईनद्वारे भागपूर धरणात पाणी साठविणे प्रस्तावित आहे. त्यासाठी १८८.५० दलघमी साठवण क्षमतेचे भागपूर धरण बांधणे प्रस्तावित आहे. तसेच शिरसोली-२ या लघु पाटबंधारे तलावाची उंची वाढवून १.३९ दलघमी पाणीसाठा वाढविणे या योजनेत समाविष्ट आहे.  १८१४१  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारभागपूर मध्ये १८८.५० दलघमी पाणी साठा होणार आहे. भागपूर धरणाच्या मागच्या उंच भागास उपसा सिंचनाने १७ हजार ८३० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येईल. तसेच या धरणातून जळगाव शहरासाठी ८१.३४ दलघमी (२.८७ टीएमसी) पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. तर शिरसोली-२ (नायगाव) ल.पा. तलावात २.४० दलघमी पाणीसाठा होणार असून त्यामुळे या परिसरातील ३११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रवाही पद्धतीने हे सिंचन होणार आहे. या योजनेमुळे एकूण १८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.जळगाव व जामनेर तालुक्याला याचा लाभ होणार आहे.भागपूरचे होणार पुनवर्सनया उपसा योजनेसाठी ७४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी २७९ हेक्टर वनजमीन आहे. या वनजमीनीबाबतची परवानगी मे २००२ मध्ये मिळाली आहे. तर पर्यावरण विभागाची मान्यताही आॅक्टोबर २००२ मध्ये मिळाली आहे.तर या प्रकल्पाला केंद्रीय जलआयोगाची तत्वत मान्यता जून २००२ मध्ये प्राप्त झाली