शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जैन धर्मीयांच्या चातुर्मासाला २३ जुलैपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

चातुर्मासामुळे मुनी श्रींचा, महाराजांचा, माताजींचा, सतीया जींचा आदी तपस्वींची मंगल विहार पदयात्रा थांबणार आहे. तपस्वी ज्या स्थळी असतील,. ...

चातुर्मासामुळे मुनी श्रींचा, महाराजांचा, माताजींचा, सतीया जींचा आदी तपस्वींची मंगल विहार पदयात्रा थांबणार आहे. तपस्वी ज्या स्थळी असतील,. त्या स्थळी वर्षा योग किंवा वरुण योग अर्थात चातुर्मास स्थापना करतील, अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धिप्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली. चार महिने एकाच ठिकाणी तपस्वींचे वास्तव्य राहणार असून त्यास वर्षा योग अर्थात चातुर्मास म्हणतात. असाच योग खान्देशातील कुसुंबा येथे सोळा वर्षानंतर चातुर्मासाचा लाभ मिळणार आहे.

हजारो मैल पदयात्रा करत तपस्वी सम्राट दिगंबर आचार्य सुनील सागरजी महामुनी श्री यांचे परमशिष्य प. पू. सुदेह सागरजी महाराज यांचे कुसुंबा नगरीत आगमन झाले. त्यांचा चातुर्मास स्थापना दि. २५ जुलै रोजी प्रथा परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. चार महिने तपस्वी एकाच ठिकाणी वास्तव्याला राहत असल्याने चातुर्मासाचे औचित्य साधून आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असतात. हजारो शिक्षक मिळून जे काम होऊ शकत नाही, ते काम तपस्वी साधूंच्या मार्गदर्शनाने तसेच संगत गुणाने सहज होते. वर्षायोगाच्या काळात समाजात एक नवीन प्रेरणा जागृत होते. ज्या गावात, ज्या शहरात, जिथे जिथे चातुर्मास सुरू होतो, तिथे तिथे वातावरणात एक आगळे-वेगळे चैतन्य निर्माण होते.

बालकांमध्ये नैतिकता व सद्गुणांचे बीज पेरले जाते. वृद्धांमध्ये विरक्त व संन्यासाची भावना जागृत होते. युवक वर्ग व्यसनांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आत्मिक तपस्या वृद्धिंगत करण्यासाठी चातुर्मास फार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्या चार महिन्याच्या कालावधीत साधू महात्म्यांचा सहवास राहिल्याने अनेक जणांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येते. पूज्य श्रींच्या सानिध्यात पंकज नगिनदास जैन यांच्यातर्फे मंदिरात दिनांक १६ जुलै ते २३ जुलैपर्यंत विश्वशांती महायज्ञ व सिद्ध चक्र महामंडल विधान महापूजा संपन्न होत आहे.