शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खासदार ए.टी.पाटील यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:03 IST

तालुका वार्तापत्र : पारोळा

ठळक मुद्देभाजपातील वाद ठरेल राष्टÑवादीला लाभदायक : शिवसेनेच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून

पारोळा : गेल्या १० वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांची नाराजी भाजपला भोवणार का? अशी चर्चा पारोळा तालुक्यात सुरू आहे. कोणतेही कारण न देता खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने स्थानिक भाजपचे कार्यकर्ते हे कमालीचे नाराज आहेत. आणि खासदार ए.टी. पाटील यांनी वेगळी चूल मांडावी असे ते आग्रही आहेत.असे असले तरी खासदार ए.टी.पाटील यांना जळगाव लोकसभेच्या उमेदवारीबाबत आपला फेरविचार होऊ शकतो, असा विश्वास वाटत आहे. म्हणूनच दोन दिवसात जर फेरविचार झाला नाही तर खासदार ए.टी.पाटील काय भूमिका कार्यकर्त्यांच्या जीवावर घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.पारोळा तालुका हा जनसंघाचा तालुका आणि भाजपासाठी बालेकिल्ला समजला जातो. पण खुद्द तालुक्याच्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापल्याने लोकांच्या मनात प्रचंड राग आणि रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा रोष मिटवून पारोळा तालुक्यात भाजपच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांना मताधिक्य घेण्याची कसरत करावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत खासदार ए.टी.पाटील यांना पारोळा तालुक्यातून १३ हजारांच्या पुढे मताधिक्य होते. ते स्मिता वाघ यांना टिकून ठेवायचे असले तर ए.टी.पाटील यांची नाराजी दूर करावी लागणार आहे.दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांची तालुक्यात पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली. त्यात तालुक्यातून आमदार डॉ.सतीश पाटील व माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांची साथ देवकर यांना आहे. गुलाबराव देवकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचा चांगला संपर्क पारोळा तालुक्याशी होता.सद्यस्थितीत भाजपची गटबाजी ही चव्हाट्यावर येत आहे. आणि ती त्वरीत न मिटविल्यास त्याचा लाभ राष्टÑवादीला होण्याची भिती आहे. एका बाजूला खासदार ए.टी.पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण