शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. या विषाणूपासून आधीचं जळगावकर त्रस्त असताना, आता दुचाकी चोरट्यांनी सुध्दा ...

जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. या विषाणूपासून आधीचं जळगावकर त्रस्त असताना, आता दुचाकी चोरट्यांनी सुध्दा जळगावकरांच्या डोक्याचा ताप वाढविला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून दिवसाला दोन दुचाकी शहरातून चोरीला जात आहेत. त्यामुळे आता दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरात घरफोडी, मोबाईल चोरी तसेच दरोड्याच्या घटनांमध्‍ये वाढ झाली होती. आता दुचाकी चोरट्यांनी डोके वर काढले आहे. शहरातून दिवसाला दोन व त्यापेक्षा अधिक दुचाकी चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर दुचाकी चोरट्यांना पकडण्‍याचे आव्हान समोर उभे राहिले असून त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी नवीन बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून मंगळपोत लांबविण्‍याच्या घटनाही वाढल्या होत्या. मात्र, पोलिसांना त्या चोरट्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे आपली दुचाकी कुठं उभी केली तर ती सुरक्षित आहे कि नाही, अशी भीती आता नागरिकांमध्‍ये निर्माण झाली आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा दुचाकी चोरून नेल्या जात आहे. गोलाणी मार्केट परिसर, भास्कर मार्केट, नवीन बसस्थानक, जिल्हा रूग्णालय परिसर व काही खाजगी रूग्णालयाच्या आवारातून गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या परिसरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असावा, अशीही मागणी होत आहे.