शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आता़़स्वस्त धान्यही मिळणार कॅशलेस

By admin | Updated: January 4, 2017 01:09 IST

नंदुरबार : कॅशलेस व्यवहारांना अधिक चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांत पीओएस मशिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे़

नंदुरबार : कॅशलेस व्यवहारांना अधिक चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांत पीओएस मशिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे़ याअंतर्गत आठवडाभरात प्रायोगिक तत्त्वावर दोन दुकानांमध्ये हे मशिन बसवण्यात येणार असून त्याद्वारे कॅशलेस धान्य देण्याची सोय करण्यात येणार आहे़ पुरवठा विभागाकडून कॅशलेस पद्धतीने धान्य देण्यासाठी आधार लिकिंंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ यामुळे येत्या काळात बायोमेट्रिक मशिनमध्ये केवळ अंगठा देऊन धान्न्याची उचल लाभार्थींना करता येणार असल्याचे पुरवठा विभागाने कळवले आहे़ उचल करणाºया लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून ती रक्कम पुरवठा विभागाला मिळणार असल्याने लाभार्थींची पैसे देण्यापासून सुटका होणार आहे़ जिल्ह्यात लवकरच बायोमेट्रिक मशिन्स प्राप्त होणार असल्याची माहिती आहे़

सहा लाख लाभार्थींची आधार जोडणी  ४अंत्योदय योजनेंतर्गत येणाºया जिल्ह्यातील लाभार्थींना वेळेवर आणि कॅशलेस धान्य मिळावे यासाठी बायोमेट्रिकच्या पहिल्या टप्प्यात सहा लाख ६५ हजार ४३२ लाभार्थींची आधार नोंदणी करण्याच्या कामांना सुरूवात करण्यात आली होती़ यात सहा लाख २० हजार ७९४ लाभार्थींच्या जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ या लाभार्थींना येत्या काळात केवळ अंगठा टेकवल्यानंतर धान्य घरी घेऊन जाणे शक्य होणार आहे़ आधार कार्ड रेकॉर्डवर त्यांचे अंगठ्याचे नमुने आणि बँकेची माहिती आहे़ यामुळे त्यांच्या खात्यातून हा पैसा वजा करण्यात येऊन तो पुरवठा विभागाला व तेथून स्वस्त धान्य दुकानदाराच्या खात्यात जाणार आहे़   ४जिल्ह्यात एकूण एक हजार ५५ स्वस्त धान्याची दुकाने डिजीटल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून या दुकानांमध्ये बायोमेट्रिक आणि पीओएस मशिन देण्यात येतील़ दुकानदारांना या सर्व प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी विविध पथक स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देणार आहेत़