शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात कुख्यात गुंड गुड्डयाची भरचौकात गोळी झाडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 18:08 IST

धुळ्यातील गोयर परिवाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. सीसीटीव्ही फुटेजमुळे झाले आरोपी निष्पन्न.

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.18- शहरातील कराचीवाला खुंट चौकात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया या कुख्यात गुंडाची हत्येतील संशयित आरोपी सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले आहेत. हा खून गोयर परिवारातील सदस्यांनी केल्याचा निष्पन्न झाल्याने रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयरसह आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील कराचीवाला खुंट चौकातील महापालिकेकडे जाणा:या पारोळा रोडवरील चहाच्या दुकानाजवळ पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्डय़ा उर्फ रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख हा काळ्या रंगाच्या स्कुटरवर आला. याठिकाणी आधीच त्याची वाट  बसलेल्या  8 ते 10 जणाना  तो भेटला. याठिकाणी टोळीतील काही लोकांशी गुड्डयाचा वाद झाला. यावेळी टोळीतील एकाने अचानक त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि गोळी झाडली़ गोळी लागल्याने गुडय़ा जखमी झाला. दरम्यान, टोळीतील अन्य लोकांनी त्याच्यावर तलवार व चॉपरने सपासप वार केल़े गंभीररित्या जखमी झाल्याने गुड्डया जमिनीवर कोसळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर हल्लेखोर आग्रारोडर्पयत पायी गेले. त्याठिकाणी उभ्या केलेल्या एका गाडीत बसून ते पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
रोज पहाटे मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना या घटनेमुळे धक्का बसला. भरचौकात अवघ्या काही मिनिटात घडलेला थरार पाहून स्तब्ध  झाल़े तर घटनेनंतर ही बातमी वा:यासारखी शहरात पसरल्याने  घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
याप्रकरणी शेख फारुक फत्तू फौजी (46) रा़ जामा मशिद, धुळे यांनी मंगळवारी धुळे शहर पोलिसात दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयर, विलास उर्फ छोटा पापा श्याम गोयर, भीमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, श्याम गोयर आणि अन्य तीन ते चार जण यांच्यावर संशय व्यक्त केला आह़े त्यांच्याविरुध्द भादंवि कलम 302, 504, 506, 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आह़े 
गुड्डयावर 35 गुन्हे दाखल होते
मयत गुड्डया याच्यावर धुळे शहरासह कोपरगाव व अन्य ठिकाणी वेगवेगळ्या कलमान्वये 35 गुन्हे दाखल आहेत़ तो मनपा जळीतकांडातील प्रमुख संशयित आरोपी होता. त्या जळीतकांडापासूनच तो जास्त प्रकाशझोतात आला होता. त्याची शहरातील व्यापा:यांमध्येही दहशत होती.
 
रफिकोद्दीन शेख उर्फ गुडय़ा याचा सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला़ यात पिस्तुल आणि तलवारीने हल्ला झाला आह़े यात जखमी झालेल्या गुडय़ाचा मृत्यू ओढवला़ त्याच्या विरुध्द विविध पोलीस ठाण्यात 35 गुन्हे दाखल आहेत़ हल्ला करत असताना या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आणि प्राथमिक तपासात काही माहिती समोर आली आह़े गोयर परिवारातील सदस्य या फुटेजमध्ये दिसत असल्याने त्यांच्यावर संशय आह़े त्यांच्या तपासासाठी तातडीने पाच पथक तयार केले असून लवकरच आरोपी ताब्यात घेण्यात येतील. 
- विवेक पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक.