शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Budget 21 : सुवर्ण व्यवसायावर जीएसटीचा भार कायम, शेती उत्पादनाला मात्र लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी या अर्थसंकल्पात चांगल्या घोषणा झाल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याच्या प्रतिक्रिया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी या अर्थसंकल्पात चांगल्या घोषणा झाल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याच्या प्रतिक्रिया शेती पूरक उद्योग क्षेत्रातून उमटत आहे. दुसरीकडे सुवर्ण व्यवसायावर जीएसटी कमी करणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने हा भार कायम राहणार आहे. मात्र आयात शुल्कात कपात केल्याने सोने-चांदीचे भाव कमी होण्यास मदत मिळून व्यवसाय वाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

कोरोनाची साथ, लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सामान्य माणूस सापडला आहे महामारीच्या महासंकटामुळे अडकलेले अर्थचक्र पूर्ववत गतिमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा वाटतो. आयकर रचनेत कोणताच बदल न करता सामान्य नागरिकाला आणि शेतकऱ्यांसाठी काही मोलाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दुप्पट करण्याचा याही वर्षाच्या अर्थसंकल्पात संकल्प केलेला आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात कृषिक्षेत्रासाठी एकूण १६.५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या दीडीपट भाव देणे, कृषी कर्जासाठी १७.५ लाख कोटी रुपयांची तरतूद, सूक्ष्मसिंचनासाठी १० हजार कोटी रुपयांची तसेच सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद, देशात ७ नवीन टेक्स्टाईल पार्क उभारणे, तांदूळ, कापूस आणि दाळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. हा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.

अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह जळगाव.

सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केल्याने त्याचा लाभ व्यावसायिकांसह ग्राहकांनाही होणार आहे. शिवाय भाव कमी होण्यासही मदत होणार असल्याने व्यवसाय वाढीस चालना मिळेल. मात्र जीएसटीचा भार तसाच ठेवला आहे. तो कमी होणे आवश्यक होता.

- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.