शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Budget 21 : कोरोना काळातील आर्थिक मरगळ होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिल्याने सर्वच क्षेत्रात येणार भरभराट येणार असून याचा सर्वच क्षेत्रात लाभ ...

जळगाव : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिल्याने सर्वच क्षेत्रात येणार भरभराट येणार असून याचा सर्वच क्षेत्रात लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या सोबतच प्राप्तीकर रचना जैसे थे ठेवण्यात आल्याने कोरोनात झळ बसलेल्यांना याचा दिलासा आहे. तसेच भाग भांडवलातील खर्च वाढविल्याने आर्थिक घडी रुळावर येऊन कोरोना काळातील मरगळ दूर होण्यासही मदत होईल, असा सूर सर्वच क्षेत्रातून उमटत आहे.

कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था मंदावलेली असताना त्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पाविषयी व्यापार, उद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात कृषीसाठी मोठ्या घोषणा झाल्याने कृषी पूरक उद्योगाला त्याचा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

——————-

यंदाचा अर्थसंकल्प समाधानकारक असून यामध्ये पायाभूत सुविधा वाढणार असल्याने त्याचा मोठा लाभ होणार आहे. या मुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. वाढीव आर्थिक मदतीसाठी कोरोना काळात देण्यात आलेल्या आर्थिक मदतीसाठीच्या निधीत वाढ केल्याने दालमिल उद्योगाला लाभ होणार आहे.

- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन

लघु उद्योगांसाठी मोठ्या घोषणा नसल्या तरी या विभागासाठी १५ हजार ७०० कोटी रुपयांचा विधी या विभागासाठी उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ होईल. शिवाय कमी भांडवलात उद्योग उभारणीच्या संधीदेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे करवाढ नसल्याने दिलासा आहे.

- किशोर ढाके, अध्यक्ष, लघु उद्योग भारती.

अर्थसंकल्पात विमा कंपन्यांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने विदेशी कंपन्यांना आवश्यक त्या संरक्षणाच्या उपाययोजना केल्यास ही परवानगी दिली जाईल असे जाहीर केले. यामुळे जागतिक विमा कंपन्यांचा भारतात गुंतवणुकीकडे कल वाढेल. एलआयसीचा आयपीओ आणण्यात सरकार उत्सुक आहे व त्यासाठी चालू सत्रात काही तरतुदी करण्याचे सूतोवाच दिलेत. यामुळे एलआयसीच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल व ग्राहकांच्या अधिकाअधिक हिताच्या उपायोजना महामंडळाद्वारे राबवल्या जातील.

- विनोद ठोळे, सिनियर बिझनेस असोसिएट, एलआयसी

सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय चांगला असून याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. शिवाय सोन्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होईल. आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा अंदात वर्तविला होता, तो खरा ठरला.

- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.

यंदाचा अर्थसंकल्प उत्तम असून पायाभूत सुविधा वाढणार असल्याने त्याचा सर्वच क्षेत्राला लाभ होईल. शिवाय जीएसटीतील ४०० कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

- पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष, कॅट

लोखंड व इतर व्यवसायासाठी चांगले निर्णय झाल्याने त्याचे स्वागत करतो. तसेच बांधकाम क्षेत्रासाठी प्राप्तीकराविषयी चांगला निर्णय झाला आहे.

- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.