शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खंडित दुभाजक देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. हरताळा फाटा गावाच्या ठिकाणी ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. हरताळा फाटा गावाच्या ठिकाणी पूल असून, सलग दुभाजक टाकण्यात आले आहे. मात्र हरताळा फाट्यावरून भुसावळकडे जात असताना तीन हॉटेलजवळ मधेच दुभाजक खंडित केला आहे. यामुळे हा अपघाताला आमंत्रण देत आहे. एकाच ठिकाणी तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

हे ठिकाण व्यावसायिक असल्याने येथे दुभाजकाला खंड का ठेवण्यात आला ? असाही प्रश्न विचारला जात आहे. खंडित असलेला दुभाजक बंद करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून जाणकारांकडून करण्यात येत आहे.

नुकतेच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम पूर्णत्वास येत असताना येथील जवळच असलेल्या तीन हॉटेलजवळ सलग असलेला दुभाजक खंडित करून याच ठिकाणी दोन लाल दिवे लावण्यात आले आहे. येथे भरधाव वेगाने येणारे वाहन व हॉटेलवरील मार्गावर लागणारे वाहन अचानक कळत नकळत येत असल्याने अपघात वाढले आहे. तरी मध्येच खंडित ठेवण्यात आलेला डिव्हायडर सलग करण्यात यावा व अपघात टाळावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

... असे झालेत अपघात

सहा महिन्यांपूर्वी दोन जानेवारीस तालुक्यातील एका शाळेच्या कर्मचार्‍याचा या हॉटेललगतच अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या महिन्यातच याच खंडित दुभाजक लगत याच जागेवर कोथळी येथील दोन दुचाकी स्वार अपघातात जागीच ठार झाले होते. याचबरोबर तसेच मध्ये दुभाजकामध्ये लहान वृक्ष लावण्यात आलेली असून, या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देत असताना भरधाव वाहनाने टँकरला धडक दिल्याचीही घडली होती. सहा महिन्यांतील या तीन घटना घडल्याचे सांगितले जाते.

दखल घेण्याची मागणी

भविष्यात अपघाताच्या अशा अनेक दुर्घटना रोखण्यासाठी येथील खंडित दुभाजक सलग करून होणाऱ्या अपघातांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फोटो कॅप्शन : १९ एचएसके ०१

हरताळा फाट्यावरून भुसावळकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलजवळ असलेला मधेच खंडित केलेला दुभाजक.