शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील वाहन सोडण्यासाठी घेतली १५ हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST

जळगाव : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करुन वाहन सोडण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारताना धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुमीत ...

जळगाव : अपघाताच्या गुन्ह्यात मदत करुन वाहन सोडण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारताना धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुमीत संजय पाटील (२७,रा.निवृत्ती नगर, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजता पाळधी दूरक्षेत्रातच पकडण्यात आले. दरम्यान, पाटील हा दूरक्षेत्राचे प्रमुख सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचा रायटर आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील २७ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. या अपघाताच्या गुन्ह्यात वाहन ताब्यात घेण्यात आलेले असून या गुन्ह्यात कागदपत्रात मदत करणे व वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबल सुमीत पाटील याने २९ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. ठाकूर व सहकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळून आले.

दूरक्षेत्रातच रचला सापळा

लाचेच्या मागणीनंतर उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील,मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व इश्वर धनगर यांनी सोमवारी पाळधी दूरक्षेत्रातच सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्विकारताच सुमीत पाटील याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे.