शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

८४ दिवसांच्या अटीमुळे अडीच लाखांवर लाभार्थींच्या दुसऱ्या डोसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात लसीकरण मोहिमेला विरोधाभासाचा फटका बसत आहे. ज्यांना लस हवी आहे, त्यांना ती मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात लसीकरण मोहिमेला विरोधाभासाचा फटका बसत आहे. ज्यांना लस हवी आहे, त्यांना ती मिळत नसून ज्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे ते मात्र, आता लसीकरणाला पुढे येत नाहीत. शिवाय दुसऱ्या डोसमधील अंतर वाढल्याने लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली असून, केंद्रे अक्षरश: ओस पडली आहेत.

लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यासाठी टास्क फोर्सने आधी ४५ वयोगटाचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यात आगामी महिनाभरात आता केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्यता अधिक आहे. याचे कारण जिल्ह्यात मार्च, एप्रिल - मे मध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने निकषानुसार पुढील महिन्यात ते दुसऱ्या डोससाठी पात्र होणार असून, त्यामुळे त्या कालावधीत त्यांची वेगळी गर्दी वाढणार आहे. यासह १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर या वयोगटात सर्वाधिक लोकसंख्या असून हाच वयोगट लसीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे ही गर्दीही राहणार आहे.

दुपटीपेक्षा अधिक अंतर

प्रत्येक गटात पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक अंतर आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिकांच्या एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे उर्वरित लसीकरण पूर्ण करून घेण्याचे मोठे आव्हान जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर राहणार आहे.

निकष शिथिल करण्याची मागणी

१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. जर केंद्रांवर गर्दीच नाही, डोस शिल्लक राहत असताना या वयोगटाच्या लसीकरणाला उशीर का? असा सूरही उमटत आहे.

जिल्ह्याची गेल्या आठवड्यापर्यंतची स्थिती

हेल्थ केअर वर्कर पहिला डोस २८२६०, दुसरा डोस १४१८४

फ्रंटलाइन वर्कर ४०११९, दुसरा डोस १४५१५

१८ ते ४४ वयोगट २०९६४, दुसरा डोस ४८४७

४५ वर्षांवरील नागरिक पहिला डोस ३ लाख ५८ हजार ६५४, दुसरा डोस १ लाख १ हजार ७६५