शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शिकवणी घेताना आढळले दोघे प्राध्यापक

By admin | Updated: January 21, 2017 00:40 IST

चाळीसगाव : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खासगी शिकवणीच्या विरोधात शिक्षण विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

चाळीसगाव : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खासगी शिकवणीच्या विरोधात शिक्षण विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात के. आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदान बंद करण्याची शिफारस गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी शुक्रवारी एका पत्राद्वारे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी  यांच्याकडे केली आहे.  यामुळे घरी ‘शिकवणीची शाळा’ भरविणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले असून कोतकर महाविद्यालयातील दोघे प्राध्यापक १२ रोजी सकाळी ८ वाजता शिकवणी घेताना आढळले होते.   याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा माध्यमिक  शिक्षणाधिकाºयांकडे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, १२ रोजी कोतकर महाविद्यालयातील प्राध्यापक बी. आर. येवले, अनिल रामसिंग मगर हे सकाळी ८ वाजता खासगी शिकवणी घेत असल्याचे आढळून आले होते.  गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी तसेच केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी अचानक भेटी दिल्या असता हा प्रकार आढळून आला. शिकवणी घेताना आढळून आलेल्या प्राध्यापकांनी प्राचार्यांना शिकवणी न घेण्याचे हमीपत्र लिहून दिले आहे.  याबाबत शिक्षण विभागाने प्राध्यापक हे शाळा विभाग सेवाशर्तीचे उल्लंघन करीत असल्याची बाब प्राचार्य व संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली. मात्र यानंतरही शिकवण्या सुरूच होत्या. यानंतर प्राचार्य यांनी खुलासा सादर करताना महाविद्यालयातील प्राध्यापक शिकवण्या घेत नाही. मात्र तसेच कुणी आढळल्यास आपण कारवाई करावी, असे नमूद केले. त्यानुसार शुक्रवारी २० रोजी शिक्षण विभागाने थेट महाविद्यालयाचे अनुदान बंद करण्याची शिफारस केली.  खासगी शिकवणी विरोधात यापुढेही कडक कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. संस्थाचालक, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी शिक्षकांना सूचना द्याव्यात. दोषींची गय केली जाणार नाही. -सचिन परदेशी, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव़महाविद्यालयातील प्राध्यापकांना खासगी शिकवणीस संस्थाचालकांचा  विरोध आहे. मात्र यानंतरही शिकवणी घेणारे कुणी आढळले असेल तर शिक्षण विभागाने कारवाई करावी. महाविद्यालयास वेठीस धरूनये. यापूर्वीच महाविद्यालयाने शिक्षण विभागाला लेखी कळविले आहे. -प्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, कोतकर कनिष्ठ महाविद्यालय़