शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसचा फॉम्यरुला 23 रोजी ठरणार

By admin | Updated: January 22, 2017 00:35 IST

आघाडीची संयुक्त बैठक : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांअभावी चर्चा अपूर्ण

जळगाव : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडी करून आपापल्या पक्ष चिन्हावर जि.प. व पं.स.च्या निवडणुका लढतील. ज्या गट व गणात ज्या पक्षाचा उमेदवार मागील निवडणुकीत आघाडीवर होता तो गट व गण ताकद असलेल्या पक्षाला सोडला जाईल. तसेच जागा              वाटपाचा निर्णय 23 रोजीच्या संयुक्त बैठकीत ठरेल, असा निर्णय शनिवारी दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत झाला. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही बैठक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, अॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, डी.जी.पाटील, विकास पवार आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांअभावी चार तालुक्यांची चर्चा अपूर्णकाँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अॅड.ललिता पाटील हे अनुपस्थित होते. त्यामुळे बैठकीत यावल, रावेर, अमळनेर व चोपडा या तालुक्यांबाबत सविस्तर चर्चा झाली नाही. पण इतर तालुक्यांमध्ये कुणाची किती ताकद, सद्य:स्थिती याबाबत चर्चा झाली, अशी माहिती डॉ.सतीश पाटील व अॅड.संदीप पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. पक्ष चिन्हावर लढणारआघाडी झाली, पण दोन्ही पक्ष संबंधित गट व गणांची निवडणूक आपापल्या निवडणूक चिन्हांवर लढतील. फक्त जेथे ज्या                         पक्षाची ताकद आहे ती जागा संबंधित पक्षाला मिळेल. त्या गटात,                       गणात मित्र पक्षाचा उमेदवार                    दिला जाणार नाही, हे                        निश्चित झाल्याचे आमदार डॉ.पाटील म्हणाले. पुन्हा चर्चा करणारयेत्या 23 रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दोन्ही काँग्रेसची पुन्हा संयुक्त बैठक होणार आहे. त्यात कुठल्या पक्षाला किती जागा सुटतील हा फॉम्यरुला निश्चित होईल. जागावाटप निश्चितीनंतर दोन्ही पक्ष आपापले उमेदवार जाहीर करणार असल्याचे डॉ.सतीश पाटील म्हणाले.