शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा काळाबाजार; आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:20 IST

तिसरा गुन्हा दाखल : दोघांना सोडले जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असून, जिल्हा पेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी आणखी ...

तिसरा गुन्हा दाखल : दोघांना सोडले

जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असून, जिल्हा पेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी आणखी एकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा हा याच पोलीस स्टेशनला तिसरा गुन्हा आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी तीन जणांना चौकशीसाठी आणण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत बंदद्वार ही चौकशी चालली. त्याबाबत पोलिसांनी पत्रकारांना माहिती देणं टाळलं होतं. चौकशीअंती दोघांना सोडून देण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी मुर्शरफ खान मसूर खान (वय २६, रा. मासुमवाडी) या तरुणाला सिंधी कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याकडून एक रेमडेसिविर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठा काळाबाजार करून जादा भावाने विक्री होत आहे. बुधवारी सायंकाळी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एक तरुण रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी सापळा रचून सायंकाळी ४ वाजता मुर्शरफ खान मसूर खान याला अटक करून त्याच्या ताब्यातील पाच हजार ४०० रुपये किमतीचे रेमडेसिविर इंजेक्शन हस्तगत केले आहे. याप्रकरणी प्रशांत पाठक यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.