शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला भाजपचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

जामनेर : भाजपचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी साडेअकराला भाजप कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात ...

जामनेर : भाजपचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी साडेअकराला भाजप कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन केले. सुमारे पाऊण तास पदाधिकारी व नेत्यांनी रास्ता रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली होती. निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाबाजी राघो मंगल कार्यालयात एकत्र झाले होते.

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कार्यकर्त्यांनी दहन करून राज्यपालांना पाठविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. बारा आमदारांचे नियमबाह्य झालेले निलंबन मागे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. आघाडी शासनाच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्ते पालिका चौकात जमा झाले.

या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जि. प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, महेंद्र बाविस्कर यांनी १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध केला. नगराध्यक्ष साधना महाजन, शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष विजया खलसे, डॉ. प्रशांत भोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.