शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

4 तालुक्यात भाजपा जोर लावणार

By admin | Updated: January 23, 2017 01:10 IST

नियोजन : आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणास लागणार

जळगाव : गेल्या 15 वर्षापासून जिल्हा परिषद व सद्य:स्थितीला पाच पंचायत समिती ताब्यात असलेल्या भाजपाकडून जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपासाठी आगामी निवडणुकीत घोडदौड सुरू करण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आजही पक्षाला जळगाव, पारोळा, भडगाव व चोपडा या चार तालुक्यांमध्ये अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे. यशासाठी या तालुक्यांमध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे. चार पंचायत समित्या भाजपाकडेजिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांपैकी मुक्ताईनगर, बोदवड , भुसावळ  व जामनेर या चार पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. तर जळगाव, धरणगाव व एंडोल या तीन पंचायत समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. यावल व रावेर  या दोन पंचायत समित्यांवर काँग्रेसचे तर चोपडा, पारोळा, पाचोरा व चाळीसगाव या चार पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस तर भडगाव पंचायत समितीवर अपक्ष सभापती आहेत.15 पंचायत समित्यांमध्ये 44 पंचायत समिती सदस्यविधानसभा, लोकसभा, जिल्हा बँक व जिल्हा दूध संघात भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. भाजपाचे 15 पंचायत समित्यांमध्ये तब्बल 44 पं.स.सदस्यांचे संख्याबळ आहे. सर्वाधिक 10 सदस्य जामनेरात आहे. त्यापाठोपाठ रावेर व मुक्ताईनगरात 6 तर अमळनेर व चाळीसगावमध्ये 5 सदस्य आहेत. चोपडा, एरंडोल, धरणगाव या ठिकाणी भाजपाचे अत्यल्प संख्याबळ आहे. जि.प.मध्ये 24 सदस्यांसह भाजपा मोठा पक्षजिल्हा परिषदेत 24 सदस्यांसह भाजपा हा मोठा पक्ष आहे. सर्वाधिक 6 जि.प.सदस्य हे जामनेर तालुक्यातून आहेत. तर चाळीसगाव व रावेर प्रत्येकी 4, अमळनेर 3, मुक्ताईनगर 2 व एरंडोल, यावल, धरणगाव, बोदवड व भुसावळ प्रत्येकी 1 जि.प.सदस्य आहेत. आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यामुळे त्यांचे समर्थक जि.प.सदस्य भाजपामध्ये दाखल झाले. मात्र जिल्हा बँक संचालक व अमळनेर बाजार समितीचे माजी सभापती अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम भाजपावर होण्याची शक्यता आहे. आजी-माजी मंत्र्यांची परीक्षाजि.प.व पं.स.निवडणूक पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी वर्चस्वाची लढाई राहणार आहे. जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार व खासदार आहेत. गेल्या 15 वर्षापासून जिल्हा परिषद व काही पंचायत समित्या ताब्यात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करीत रणशिंग फुंकले आहे. भाजपा व सेनेची अद्याप युती झालेली नाही. यासा:यात जि.प.मधील असलेली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपा नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.भाजपाचा जळगाव, पारोळा, भडगाव व चोपडा या चार तालुक्यांमध्ये मात्र अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. चोपडा तालुक्यात एक पं.स.सदस्या भाजपाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तालुक्यात एकही जि.प.सदस्य नाहीत. तर जळगाव, पारोळा व भडगाव या तीन तालुक्यांमध्ये भाजपाचा पं.स. किंवा जि.प. सदस्य नाही. चोपडा तालुक्यात 6, जळगावमध्ये 5, पारोळ्यामध्ये 4 तर 3 अशा 18 जि.प.गटांमध्ये भाजपाचा अस्तित्वासाठी लढा या निवडणुकीत राहणार आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा व भडगावमध्ये आमदार किशोर पाटील तर चोपडय़ात आमदार चंद्रकांत सोनवणे हे शिवसेनेचे आमदार आहेत. तर पारोळा मतदार संघात राष्ट्रवादीचे डॉ.सतीश पाटील हे आमदार आहेत.