शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती गवतापासून जैविक इंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

यावल : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी यावल किसान प्रोड्यूसर कंपनी गठित करण्यात आली आहे. या ग्राम ...

यावल : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी यावल किसान प्रोड्यूसर कंपनी गठित करण्यात आली आहे. या ग्राम उद्योगाच्या माध्यमातून हत्ती गवताची लागवड करण्यास प्राधान्य देण्यात आले

आहे. याचा वापर जैविक इंधनासाठी केला जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी दिली.

येथील किसान प्रोड्युसर कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कडलक म्हणाले की तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. उंबरठ्यावर असलेला हंगाम शेतकऱ्यांना हातचा गमवावा लागतो. यावल किसान प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतीतील वेस्टेज कचरा तसेच लागवडीच्या माध्यमातून लावण्यात

येणाऱ्या गवतावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना दोन पैसे प्राप्त होईल, ही बाब शेतकऱ्यांच्या विकासासाठी हितकारक ठरेल या प्रकल्पाच्या माध्यमातून पडीक शेतीचा उपयोग करता येईल तसेच युवकांना रोजगार मिळेल. नैसर्गिक

संकटातही या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तोंड देता येईल.

किसान प्रोड्युसर व मुंबईच्या एका संस्थेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतीमध्ये हत्ती गवताची लागवड करणार आहे. या गवताचा वापर सीएनजी जैवइंधनासाठी वापर केला जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार होणार असल्याने शेतीची सुपीकता तसेच पडीक जमिनी लागवडीखाली येणार असल्याने आणि सेंद्रिय खताच्या वापरामुळे विविध जीवघेणे आजारावर प्रतिबंध येणार असल्याचाही दावा यावेळी करण्यात आला.

तालुक्यात १३ ग्राम उद्योगाची नोंदणी करण्यात आली आहे. यात फैजपूर न्हावी ,आमोदा, हिंगोणा, सांगवी बुद्रूक, विरावली, मोहराळे, कोरपावली, दहीगाव, सावखेडा वड्री, सातोद आणि अंजाळे या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये गवताची लागवड करण्यात येणार आहे. गवताचे बी हे कंपनीच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. शेतातील ओला कचरा, पालापाचोळा, केळीची पाने, खोडे, इत्यादीसह प्रकल्पाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या जैवइंधनात त्याचा वापर होणार आहे.

यावेळी चोपडा येथील उमेश पाटील, जामनेरचे जितेंद्र अहिरे, अमळनेरचे हेमंत पवार तसेच स्टेट बँक व्यवस्थापक विजय टाले ,पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक चौधरी वासुदेव पाटील, प्रकल्प शाखेचे अध्यक्ष ज्योत्स्ना दीपक पाटील, मुकुंद चौधरी, योगेश चौधरी, गोकुळ पाटील, पुष्पा पाटील, शुभम पाटील, जगन्नाथ कोल्हे, नामदेव पाटील, नीलेश पाटील, प्रतीक वारके आदी उपस्थित होते.