शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अबब !ऑनलाईन परीक्षेच्या खर्चाचे बिल पाच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. साहजिकच, ऑनलाईन परीक्षेचा खर्च हा ऑफलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. साहजिकच, ऑनलाईन परीक्षेचा खर्च हा ऑफलाईन परीक्षेपेक्षा कमी असायला हवा; पण गोपनीय कामे व ऑक्टोबर-२०२० या ऑनलाईन परीक्षेची खर्चाची बिले ही पाच कोटी रुपयांची सादर करण्‍यात आली. विशेष म्हणजे, या बिलात मक्तेदाराने विद्यापीठाला तब्बल ७५ लाख रुपयांची सूट दिली. त्यातून स्पष्ट होते की, अवास्तव दर आकारून विद्यापीठाचे आर्थिक नुकसान गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आपण तक्रार केली असून, चौकशी करण्‍याची मागणी केली असल्याची माहिती सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

विद्यापीठातील परीक्षा विभागात गेल्या चार वर्षांपासून गोपनीय कामांच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा थेट आरोपसुद्धा भंगाळे यांनी केला आहे. एकाच मक्तेदाराला चार वर्षांपासून गोपनीय कामे दिली जात आहेत. त्यामध्ये वेगवेगळे अर्थ शीर्षक तयार करून ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने त्याच मक्तेदाराला एका पानासाठी अवास्तव दराला मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षा होत आहे. कमी खर्च लागताना बिल अधिक असल्यामुळे भ्रष्टाचार होत असून याची चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.

महत्त्वाची कागदपत्रे भंगाळेंच्या हाती

निविदा प्रक्रिया न राबविता संबंधित मक्तेदाराची बिले मंजूर करून रक्कम अदा केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. परीक्षा विभागातील तीन टप्प्यांतील कामांची सुमारे ५ कोटी ३ लाख ९५ हजार रुपयांची बिले मक्तेदाराकडून सादर करण्‍यात आली आहेत. त्यात तिसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा बिलाची रक्कम ही २ कोटी ८ लाख ४२ हजार रुपये आहे. मात्र, मक्तेदाराकडून अवास्तव दर आकारले असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात येताच, त्यांनी मक्तेदारास बोलवून चर्चा केली व अखेर चर्चेअंती मक्तेदाराने तब्बल ७५ लाख रुपयांची सूट विद्यापीठाला दिली. ही सूट कुठल्या आधारावर दिली व आधीच विद्यापीठाने दर तपासले नाहीत का? बिले कशी दाखल करून घेतली, असा सवाल विष्णू भंगाळे यांनी तक्रारीतून उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणासंदर्भातील काही कागदपत्रे त्यांच्याकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सध्याच्या बिलांची शहानिशा करा...

प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन हे नाशिक येथून विद्यापीठाचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे सध्याचे बिलदेखील मागील बिलाप्रमाणे अवास्तव असू शकते. त्यामुळे त्यांनी शहानिशा करूनच बिलांना मंजुरी द्यावी. तसेच संबंधित मक्तेदाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिलांमध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांची सूट आणखी द्यावी, अशी मागणी भंगाळे यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी, पालकांवरसुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जे शुल्क आकारले असतील, ते परत करण्‍यात यावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

थँक्स म्हणा...

मक्तेदाराने बिलामध्ये सूट दिल्याबाबत विद्यापीठाने पत्र काढले आहे. त्यावर कुलगुरूंनी स्वाक्षरी केली आहे. सूट मिळाली म्हणून स्वाक्षरीसोबतच त्यांनी मक्तेदार यांना थँक यू म्हणावे, असाही शेरा दिला आहे.

सखोल चौकशी करण्यात येईल

विद्यापीठात अवास्तव बिल मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार करण्‍यासाठी गुरुवारी जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्‍यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याशी थेट संपर्क साधला. किती बिल सादर झाले, त्यात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची त्यांनी तक्रार केली. तर सिनेट सदस्य भंगाळे यांनीदेखील तक्रारीची माहिती त्यांना दिली. त्यावर कुलगुरू यांनी त्यांना भेटण्यास बोलाविले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कुलगुरू व मराठे यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप मराठे यांनी माध्यमांना दिली आहे.