शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळची लेडी डॉन सानिया कादरी आता केळी व्यावसायात

By admin | Updated: May 10, 2017 11:31 IST

बुधवारी केली सुमारे दीड कोटी रुपयांच्या केळीची खरेदी

भुसावळ,दि.10 - भुसावळात माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी व लेडी डॉन म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांनी अचानक केळी वाहतूक आणि व्यापारात उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या केळी वाहतुकीच्या क्षेत्रात सक्रीय झाल्या आहेत.
दरम्यान, बुधवार, 10 रोजी सानिया कादरी यांनी मुक्ताईनगर, पुरनाड, यावल आणि ऐनपूर येथील शेतक:यांकडील तब्बल 45 वाहने केळीची खरेदी करुन ती  दिल्ली, कानपूर या भागातील बाजारपेठेत रवाना केल्याची माहिती शेतक:यांनी दिली. 45 वाहनांमधील (ट्राला) केळी मालाचे मूल्य तब्बल दीड कोटीच्या घरात असल्याची माहिती ऐनपूर येथील शेतक:यांनी ‘लोकमत’ दिली.
दरम्यान, ‘लोकमत’ने सानिया कादरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, केळी व्यावसायात शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. व्यापारी केळी पिकवणा:या शेतक:यालाच लूबाडत आहेत. शेतकरी हित जपण्यासाठी आपण व्यावसायात आले आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सानिया कादरी यांनी भुसावळात वास्तव्य केल्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप होऊन भुसावळ नगरपालिकेने त्यांच्या बंगल्याचे बांधकाम पाडले होते. त्यानंतर भुसावळातील गोळीबार प्रकरणात सानियासह कुटुंबातील सदस्य व अंगरक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होऊन अनेक दिवस जळगाव जिल्हा न्यायालयात कामकाज चालले. या दरम्यान त्या अनेक दिवस कारागृहात होत्या. या खटल्यात त्यांच्यावर आरोप सिद्ध न झाल्याने त्या निदरेष मुक्त झाल्या आहेत. दरम्यानच्या काळात सानिया कादरी यांनी बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली होती.