जळगाव : पंचायत समिती सदस्यांचे पती, दोन माजी सरपंच आणि अनेक माजी पदाधिकारी निवडणूक रिंगणात असल्याने भादलीची निवडणूक विशेष चुरशीची ठरली. यात एक जागा आधीच बिनविरोध आल्याने १४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी यांचे पती मिलिंद चौधरी यांचा प्रभाग दोनमधून विजय झाला, तर प्रभाग तीनमध्ये पोलीस पाटील ॲड. राधिका ढाके यांचे पती गोपाळ ढाके यांचा पराभव झाला.
यात प्रभाग एकमध्येही लक्षवेधी लढत झाली. प्रभाग एकमध्ये माजी सरपंच जितेंद्र नारखेडे व माजी सरपंच शंकर नारखेडे यांच्यातील लढतीत जितेंद्र नारखेडे यांनी बाजी मारली. त्यांना ४७८ मते मिळाली.
भादलीचे विजयी उमेदवार
प्रभाग १ : जितेंद्र ओंकार नारखेडे (४७८), शोभा रेवानंद झांबरे (४२०)
प्रभाग २ : मिलिंद दत्तात्रय चौधरी (४८५), रवींद्र सुरेश पाटील (४३९), पूजा नरेंद्र नारखेडे (३२८)
प्रभाग ३ : मनोज तुळशीदास चौधरी (७००), परेश रमेश रडे (३९३), विजया भागवत चौधरी (४२४)
प्रभाग ४ : संदीप दत्तात्रय कोळी (६२०), गिराबाई छगन कोळी (६०७), अंजली गुरू संजना जान (५४८)
प्रभाग ५ : अरुण गोपीचंद सपकाळे (४२७), कीर्ती प्रकाश कोळी (४३८), विद्या खेमचंद कावळे (५१४)