शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेचे यावलला १३ हजारावर लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:00 IST

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे यावल तालुक्यात १३ हजार १७३ लाभार्थी आहेत.

ठळक मुद्देलाभार्र्थींना आता मिळणार एक हजार रुपये मानधनलाभार्र्थींनी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे प्रशासनाचे आवाहन

यावल, जि.जळगाव : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे यावल तालुक्यात १३ हजार १७३ लाभार्थी आहेत. महाराष्ट्र शासनाने येत्या आॅक्टोबर महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्र्थींना प्रति महिना एक हजार रुपये देण्यात येणार असल्याचा आदेश कार्यालयास प्राप्त झाला असल्याचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी सांगितले.तहसीलदार कुवर यांनी सांगितले की, निराधारासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या १३ हजार १७३ लाभार्र्थींंना पुढील महिन्यापासून प्रतिमाह एक हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. या लाभार्र्थींंमध्ये विधवा महिलांना एक हजार मानधन, महिलेस एक अपत्य असल्यास अकराशे रुपये, दोन अपत्य असल्यास बाराशे रुपये मानधन मिळणार आहे. याकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांनी स्थानिक पातळीवर आपल्या गावातील तलाठ्याकडे आधार कार्डाची झॅरोक्स प्रत, अपत्यांच्या जन्माची नोंद दाखले, बँकेच्या पासबुकची झॅरोक्स प्रत तत्काळ जमा करावी तर अपंग लाभार्र्थींनी आपला अपंगत्वाचा दाखला सोबत आधारकार्ड, बँकेचे पासबुक तत्काळ आॅनलाईन करावे, अशी माहिती तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी दिली. यावल तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्र्थींना दर महिन्यास ८५ लाख रुपयांचे मानधन वितरीत करण्यात येते. आता शासनाने लाभार्र्थींचे मानधन एक हजार रुपये केल्याने वितरीत होणारे मानधन हे आता एक कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.शासनाने नव्याने वाढवून दिलेले एक हजार रुपयांचे मानधन हे पात्र लाभार्र्थींपर्यंत पोहोचावे यासाठी तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, संजय गांधी निराधार योजना विभागाचे अव्वल कारकून रवींद्र मिस्त्री, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हे प्रयत्नशील आहे. त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी व समितीच्या सदस्यांचे सहकार्य मिळत आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारYawalयावल