शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग बोगद्यांच्या कामास अखेर प्रारंभ

By admin | Updated: February 15, 2017 01:06 IST

आजपासून प्रत्यक्ष काम सुरु होणार

जळगाव : पिंप्राळा व परिसरातील सुमारे 4 लाख नागरिक ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजाडला. पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्यानजीक 2 बोगदे तयार करण्यासाठी मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत शुभारंभ करण्यात आला. बुधवारपासून प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. 9 महिन्यांची मुदत मक्तेदाराला देण्यात आली असली तरी 5 महिन्यात दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण करण्याचा मक्तेदाराचा प्रय} राहणार आहे. या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी दूर होणार असून पिंप्राळा परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.  आज झाडे तोडून खोदकामास सुरुवात होणारमंगळवारी दुपारी बजरंग पुलानजीक भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी  मनपा आयुक्त जीवन सोनवणे, माजी उपमहापौर रमेशदादा जैन,  सुनिल महाजन, संदेश भोईटे, अमर जैन, श्यामकांत सोनवणे, दिपाली पाटील व  रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोगद्याच्या जागेची आखणीही करण्यात आली.  बुधवारी बोगद्यासाठी अडसर ठरणारी तीन झाडे तोडली जाणार आहे. त्यानंतर खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. 4 लाख नागरिकांचा प्रश्न मार्गी लागेलशहरातील रेल्वेमार्गावर असलेला बजरंग बोगदा  प्रेम नगर, एसएआयटी कॉलेज, मुक्ताईनगर, पिंप्राळा व महामार्गाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण आहे. मात्र तो अरुंद असल्याने व तेथून  सांडपाणी व पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असते. तसेच पिंप्राळा रेल्वेगेट देखील अनेकदा बंद असते. यामुळे या ठिकाणी देखील वाहतुकीचा खोळंबा होत असतो. मात्र नवीन बोगदे तयार होत असल्याने ही समस्या आता मार्गी लागणार आहे. 9 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेचे अभियंते चिन्मय यादव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.दररोज 16 ते 18 तास कामबुधवारपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून, नऊ महिन्यात या बोगद्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी रेल्वेचे कर्मचारी दररोज 16 ते 18 तास काम करणार असल्याची माहिती रेल्वेचे अभियंते चिन्मय यादव यांनी दिली.   3 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीतून दोन  नविन बोगदे बांधण्यासाठी निविदा प्रकीया पूर्ण करून त्यानुसार आता कायार्देश दिल्यानतंर या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पादचा:यांसाठी स्वतंत्र व्यवस्था बोगद्यातून पाचा:यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दोन्ही बोगद्यांमध्ये 1 मीटरचा  फुटपाथ तयार करण्यात येणार आहे. त्या फुटपाथ खालून गटारीची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरुन त्यातून पाणी वाहून जाईल. पिंप्राळा परिसरातील अनेक कॉलन्यांमधील रहिवाशांचे हाल थांबावे, यासाठी दोन बोगदे तयार करण्यात यावे, यासाठी प्रय} केले. अखेर आज या कामाचा शुभारंभ झाला. 9 महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र त्यापूर्वीच ते काम पूर्ण होईल. -संदेश भोईटे, नगरसेवक.