शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेत ‘कॅश’ शॉर्टेज, मिळताहेत फक्त पाच हजार

By admin | Updated: March 6, 2017 00:33 IST

धरणगाव : रिझव्र्ह बँकेकडून पुरवठा होत नसल्याने ग्राहक अडचणीत

धरणगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण शाखांमध्ये आर्थिक तुटवडा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्टेट बँकांच्या शाखा पाच हजारांवर रक्कम द्यायला तयार नाही. परिणामी उद्योजकांसह बाजारपेठेतील व्यवहार ठप्प  झाले आहे.सरकारने जाहीर केलेली नोटाबंदी सर्वसामान्यांनाच त्रासदायक ठरली. 100 दिवस लोटले तरी ग्रामीण भागात बँकांमधील गर्दी ओसरायला तयार नाही. आपले पैसे आपल्याला मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. आठवडय़ातून 24 हजार रुपये बँकेतून मिळणार ते कधी कुणाला एकाच वेळी मिळाले नाही, आता 50 हजारांर्पयत मर्यादा वाढवली, मात्र 50 हजार मिळणे तर दूरच, पाच हजार रुपये ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. यामुळे जनता त्रस्त झाली आहे.धरणगाव तालुक्यातील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांना फक्त पाच हजार रुपये  दिले जात आहेत.   त्यात हजार रुपयांचे दहा-दहांचे डॉलर स्टेट बँकेकडून दिले जात असल्याने व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे. पुरेशी रक्कम स्टेट बँकेतून मिळत नसल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहे.जिनिंग उद्योजक त्रस्तस्टेट बँकेच्या ग्रामीण शाखांमधून पाच हजारांवर रक्कम मिळत नसल्याने जिनिंग उद्योजकांची आर्थिक कुचंबना झाली आहे. कापसाचे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी जिनिंगला रोख रकमेत कापूस विक्री करायला येत आहे. मात्र जिनिंग उद्योजगांकडे कॅश नसल्याने उद्योगही ठप्प झाला आहे.एरंडोल/धरणगाव : 10 रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसल्याने बाजारपेठेत हे नाणे कुणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्टेट बँक देत असलेले या नाण्याचे करावे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टेट बँकेने दहाचे कॉईनचे चलन सुरू असल्याचे स्पष्ट करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.रिझर्व बॅँक ऑफ इंडियातर्फे मिळणारे चलन अल्प असल्याने ग्राहकांना पाच हजार  रुपये दिले जात आहेत. जास्तीची रक्कम आल्यास ग्राहकांना जास्त पैसे देऊ. तसेच 10 रुपयांच्या नाण्याचे चलन सुरू आहे. अफवांवर विश्वास कुणीही ठेऊ नये. - अश्विनीकुमार देवरे,  शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक, धरणगाव स्टेट बँकेकडून आम्हाला फक्त पाच हजार रुपये मिळत आहे. त्यामुळे रोख स्वरूपात शेतक:यांकडून कापूस खरेदी होत नाही. धनादेशही 15 दिवसात वटत आहे. त्यामुळे शेतक:यांना अडचण निर्माण झाली असून, उद्योजकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.     -मुर्तेझा मुश्ताक बोहरी, उद्योजक, धरणगाव