शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बॅलेट आणि कंट्रोल युनिट बंदोबस्तात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 23:39 IST

जि.प. आणि पं.स. निवडणूक : आता लागले मतमोजणीच्या दिवसाकडे लक्ष, चर्चाचे नुसतेच गु:हाळ सुरु

चाळीसगाव : जि. प.  व पं.स.साठी गुरुवारी मतदान झाल्यावर निवडणुकीचा धुराळा खाली बसला असला तरी वेवेगळ्या चर्चाचे गु:हाळ मात्र सुरू झाले आहे. मतमोजणीस तब्बल सात दिवसांचा अवधी असल्याने तर्कवितर्काचा पाराही वाढला आहे. सर्वच उमेदवार व मतदारांचे लक्ष आता मतमोजणीच्या दिवसाकडे लागले आहे. चाळीसगाव तालुक्यात 257 मतदान केंद्रांवर मतदानासाठी वापरले गेलेले बॅलेट व कंट्रोल युनिट (मतदान यंत्रे) यांना शहरातील य.ना. चव्हाण महाविद्यालायत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. 634 बॅलेट व तेवढेच कंट्रोल युनिट आहेत. गुरुवारी सायंकाळी निवडणूक कर्मचा:यांनी आपापल्या केद्रावरील मतदान साहित्य जमा केले. यानंतर हे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून यासाठी दोन अधिका:यांसह 8 कर्मचारी अशा एकूण 10 कर्मचा:यांची गस्तीसाठी नियुक्ती केली आहे. महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाशेजारीच स्ट्राँगरूम तयार करण्यात येऊन बॅलेट व कंट्रोल युनिट ठेवण्यात आले आहेत. 23 रोजी मतमोजणी होणार असल्याने 7 दिवस बंदोबस्तातील मतदान साहित्यावर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली. निकाल लागण्यास वेळ असल्याने आता चर्चेस चांगला वाव मिळत आहे. अंदाज वर्तविण्यासह काही ठिकाणी पैजा लावणेही सुरू झाले असून कोण जिंकणार? हाच विषय आता आहे.अंत्यविधीनंतर बजावला कुटुंबीयांनी मतदानाचा हक्करांजणगाव, ता.चाळीसगाव येथे आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर लगेच मतदानास जाऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून येथील चव्हाण कुटुंबीयांनी गावात एक आदर्श उभा केला आहे. प्रकाश नागोजीराव चव्हाण यांची आई मनुबाई नागोजी चव्हाण (वय 81) यांचे 15 रोजी रात्री 11 वाजता निधन झाले. त्यांच्यावर 16 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. आईला अगिAडाग देऊन आल्यावर त्यांनी आपले दु:ख बाजूला सारत मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे काम केले. जिल्हा परिषद शाळेत जाऊन प्रकाश चव्हाण तसेच त्यांची पत्नी शोभाबाई, वहिनी सरलाबाई, मुलगा हितेश यांनी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी मतदान केले. याबद्दल गावक:यांकडून चव्हाण कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी गावातील काही बाहेरगावी असलेले चव्हाण यांचे नातेवाईक गावात आले होते व त्यांनीही मतदानाचा अधिकार बजावल्याने 30 ते 35 जणांच्या मतदानाची भर पडली.